आद्याक्षर सूची (2225)

Sake

(used chiefly in phrases) १ (cause) कारण (न.), हेतु (पु.) २ (concern regard) संबंध (पु.) (for the sake of - करिता, - स्तव, -साठी)

Shift

१ बदलणे, पालटणे २ हलवणे, हलणे, n. १ पाळी (स्त्री.) २ बदल (पु.), पालट (पु.) ३ हलवाहलव (स्त्री.)

Shrine

१ (a case for an idol) देव्हारा (पु.) २ देऊळ (न.), मंदिर (न.) ३ (a saint's tomb) समाधि (स्त्री.), छत्री (स्त्री.)

Sin

१ पाप (न.) २ (offence)गुन्हा (पु.), अपराध (पु.) ३ पापाचरण (न.), दुष्कर्म (न.), v.i. १ पाप करणे २ अपराध करणे ३ दुष्कर्म करणे

Slight

थोडका, बेताचा, किंचीत, n.अवमान (पु.), अनादर (पु.), v.t. १ अवमानणे, अनादर करणे २ तुच्छ लेखणे

special care

१ विशेष सावधगिरी (स्त्री.) २ विशेष काळजी (स्त्री.) ३ विशेष देखरेख (स्त्री.) ४ खास जपणूक (स्त्री.)

Squat

१ (to sit down upon the hams or heels) पालखट मारुन बसणे, मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे २ (to settle on land especially new or unoccupied without right or title) अनधिवास करणे

Stake

१ खुंटी ठोकणे, खुंट्या मारून आखणे २ पण लावणे, होड लावणे, बाजी लावणे, n.१ खुंटी (स्त्री.), खुंटा (पु.) २ पण (पु.), होड (स्त्री.) ३ खोल हितसंबंध (पु.)

Standard

१ मानक (न.) २ प्रमाण (न.), मान (न.) ३ (banner) ध्वज (पु.) ४ (emblem) ध्येयचिन्ह (न.) ५ इयत्ता (स्त्री.), adj. प्रमाणभूत, प्रमाणावरहुकूम

Start

१ (to begin) आरंभ करणे, सुरवात करणे २ प्रस्थान करणे, n. आरंभ (पु.), सुरवात (स्त्री.) (to start with आरंभी)

Sanction

मंजूर करणे, n. १ मंजूरी (स्त्री.) २ (suopport confirmation) पाठबळ (न.) ३ Law (a penalty or punishment provided as a means of enforcing obdience to a law) अनुशास्ति (स्त्री.)

Satisfy

१ संतोष देणे, संतोष होणे, समाधान करणे, समाधान होणे २ फेड करणे ३ पूर्ती करणे, पूर्ती होणे

Scale

१ श्रेणी (स्त्री.) २ (as of pay etc.) मान (न.), (as in:pay scale वेतनमान) ३ मापणी (स्त्री.) ४ (relative measure) प्रमाण (न.), परिमाण (न.) ५ (a balance pan) पारडे (न.) ६ (in pl.balance) तागडी (स्त्री.), तराजू (पु.) ७ खवला (पु.) v.t.& i. १ (शिडीप्रमाणे) वर चढणे २ प्रमाणशीर नियमन करणे ३ खरवडणे

Shade

१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ छटा (स्त्री.) ३ साब्रलीची जागा (स्त्री.), सावट (न.) ४ (as, of meaning) अर्थच्छटा (स्त्री.), सूक्ष्म भेद (पु.) ५ छायक (न.) (as in : lamp shade दीपछायक)

Short

१ छोटा, लघु, लहान २ ठेंगू, बुटका ३ अल्प ४ -हस्व ५ आखूड, तोकडा ६ कमी, उणा ७ अल्पकालिक (to fall short of कमी पडणे, अपुरा पडणे)

Singular

१ अद्वितीय, विशिष्ट २ Gram.एकवचनी ३ व्यक्‍तिशः (as in : all and singular सर्व मिळून आणि व्यक्‍तिशः) ४ (as, in behaviour) तर्‍हेवाईक, n.Gram.एकवचन (न.)

Society

१ समाज (पु.) २ संस्था (स्त्री.), मंडळी (स्त्री.), cf.Association ३ जमात (स्त्री.) ४ (fellowship, company) सहवास (पु.), संगत (स्त्री.) ५ (the fashionable and wealthy class) उच्चभ्रू समाज (पु.), शिष्टमंडळ (स्त्री.)

Soil

१ मृद (स्त्री.), माती (स्त्री.) २ लागवडीची जमीन (स्त्री.) ३ धरती (स्त्री.) ४ देश (पु.)

Stand for

१ (to be symbol of ) प्रतीक होणे, प्रतीक असणे २ (to contend openly on behalf of a principle) पाठींबा देणे ३ दर्शवणे ४ प्रतिनिधित्व करणे ५ -चे चिन्ह असणे ६ -साठी उभा राहणे

Strength

१ ताकद (स्त्री.), कुवत (स्त्री.), बळ (न.) २ संख्या (स्त्री.), मनुष्यबळ (न.) ३ तीव्रता (स्त्री.)

Staff

१ सामग्री (स्त्री.) २ सार (न.) ३ सटरफटर समान (न.), v.t. १ ठेचून भरणे २ पेंढा भरणे ३ मसाला भरणे

Sharp

१ तीक्ष्ण २ तीक्ष्ण धारेचा, तल्लख ३ तल्लख बुद्धीचा ४ तीव्र ५ टोक असलेला, अणकुचीदार ६ (very attentive) अतिसावध, कडक (पहारा इत्यादि) ७ चपळ ८ (fiery, violent)कडाक्याचा ९ (as, bends, curves, etc.) अचानक १० (as, sound) कर्कश, कानठळ्या बसवणारा, adv. बरोबर (as in : at seven sharp बरोबर सात वाजता)

Sick

१ आजारी २ (disgusted) कंटाळलेला, त्रासलेला ३ (pining) झुरणारा (as in : homesick घरासाठी झुरणारा) ४ खंत घेतलेला, n.रुग्ण (सा.), दुखणेकरी (सा.) (to be sick उलट्या होणे, आजारी पडणे)

Simple

१ साधारण २ साधा, सरळ, गुंतागुंत नसलेला ३ सुलभ ४ साधेपणाचा ५ भोळसट, बावळट ६ शुद्ध, निलाखस

So

१ अतः, अतएव, म्हणून, यासाठी २ असे;, याप्रमाणे, तसे, त्याप्रमाणे, प्रमाणे, हे, याप्रकारे, इतका

Standing

१ स्थायी २ नेहमीचा, कायमचा ३ (as, crops, etc.(--not yet harvested)उभा; (as, water(--stagnant) साचलेला, n. १ (length of service) सेवाकाल (पु.) २ (reputation) प्रतिष्ठा (स्त्री.) ३ (duration) अवधि (पु.), काळ (पु.) (as in : a custom of long standing फार काळापासून चालत आलेली रुढि)

Sure

१ खात्रीचा, निश्चित, ठाम २ (secure) निर्धोक ३ (never failing) अचूक, adv. खात्रीने, निश्चितपणे

Susceptible

विवश, वेदनक्षम, ग्रहणकक्षम, (भावना, दु:ख किंवा रोग इत्यादींच्या) चटकन आहारी जाणारा, नाजूक प्रकृतीचा

Scout

बालवीर (पु.), v.t.& i. १ (to reject with scorn or ridicule) धुडकवणे २ (to ridicule) रेवडी उडवणे ३ टेहळणे, नजर ठेवणे ४ माग पाडणे ५ बालवीराप्रमाणे सेवा करणे

Secular

१ लौकिक (as in : secular activity लौकिक कार्य, लौकिक व्यापार) २ धर्मनिरपेक्ष (as in : secular state धर्मनिरपेक्ष राज्य) ३ दीर्घकालिक

Sheet

१ (कागद काच कापड वगैरे यांचा) मोठा तुकडा (पु.) २ पत्रा (पु.) ३ चादर (स्त्री.) ४ Geol. (a sill) स्तर (पु.)

Shower

१ सर (स्त्री.) २ वर्षाव (पु.), v.t.& i. १ (सर पाऊस वगैरे) कोसळणे २ वर्षाव करणे, वर्षाव होणे

Smooth

१ गुळगुळीत २ सुरळीत ३ (ground) चोपडा ४ (soft) मऊ, मृदु ५ (fair spoken) गोडीगुलाबीचा, v.t. १ गुळगुळीत करणे २ सुरळीत करणे

Solid

१ घन भरीव २ भरीव (as in:solid votes भरीव मते) ३ घट्ट ४ एकजुटीचा ५ भरभक्कम ६ सप्रमाण (as in:solid argument सप्रमाण युक्‍तिनवाद)

Spray

तुषारणे, फवारणे, फवारा मारणे, n. १ तुषार (पु.), फवारा (पु.) २ (an apparatus for sprinkling) तुषार यंत्र (न.), फवारा यंत्र (न.)

Substitute

१ बदली माणूस (पु.), बदली (सा.) २ प्रतिवस्तु (स्त्री.) ३ Gram.आदेश (पु.), v.t. १ -च्या जागी ठेवणे, -च्या जागी योजणे २ (to replace) बदली देणे, बदली ठेवणे

Salute

१ (to greet) अभिवादन करणे २ (to honour by a discharge of cannos or guns) (तोफांची) सलामी देणे, n. १ अभिवादन (न.) २ (तोफांची) सलामी (स्त्री.)

Scrap

१ चिटोरा (पु.) २ (लोखंड वगैरेची) मोड (स्त्री.), v.t. १ मोडीत काढणे २ निरुपयोगी म्हणून टाकून देणे, त्याज्य ठरवणे

Secure

१ सुरक्षित करणे २ Law (as a debt by a mortgage) प्रतिभूत करणे ३ (to obtain as an information etc.) मिळवणे, adj. १ सुरक्षित २ निश्चित

Sensible

१ (perceptible by sense) संवेद्य, इंद्रियगम्य २ संवेदनाक्षम ३ (judicious)समजूतदार, शहाणपणाचा, सयिक्‍तिक

Serious

१ गंभीर २ कडक ३ (important, weighty) महत्वाचा, भारी ४ (earnest) आस्था असलेला, उत्साही (to take a serious n.otice of गंभीरपणे दखल घेणे)

Shadow

१ छाया (स्त्री.), सावली (स्त्री.) २ प्रतिबिंब (न.), पडछाया (स्त्री.) ३ (shelter) आसरा (पु.), v.t. १ काळवंडणे २ छाया करणे, आडोसा करणे ३ पाठलाग करणे

Sharpen

१ (to give keen edge to) धार लावणे २ टोक काढणे ३ (भूक) अधिक प्रदीप्‍त करणे ४ (दु:ख) तीव्र करणे ५ तीक्ष्ण करणे, तीक्ष्ण होणे

Sink

१ बुडवणे, बुडणे २ अखेरचे क्षण मोजणे ३ (to penetrate) रुतणे, भिनणे ४ दबणे, खोल जाणे, बसणे ५ (to decline) उतरणे, घसरणे, खालावणे ६ खचणे, खंगणे ७ (to dig as, a well, etc.) खोदणे ८ (to invest) गुंतवणे ९ (to reduce as a debt) कमी करणे, n. १ सांडवणी (स्त्री.) २ (a basin) कुंडी (स्त्री.)

Snap

१ (to break short) कटकन मोडणे २ (to make a sudden bite at ) चावा घेणे ३ ताडकन बोलणे ४ मध्येच बोलणे, ५ Photog. द्रुतचित्र घेणे

Space

१ अंतराळ (न.), अवकाश (पु.) २ (intervening distance) अंतर (न.) ३ (room)जागा (स्त्री.), पैस (पु.), v.t. १ (to arrange or adj.ust the space in or between) मध्ये अंतर ठेवणे २ (to space words, lines or letters) जागा ठेवणे

Support

१ पुष्टी देणे, पाठिंबा देणे, cf.Back २ आधार देणे ३ संभाळणे, पालन करणे ४ (as an institution) खर्च चालवणे ५ (to endure) सहन करणे, n. १ पाठिंबा (पु.) २ आधार (पु.)

Scrape

१ (to rub the surface with a sharp instrument) खरवडणे २ (to excavate) खोडून काढणे ३ (to get through) कसाबसा निसटणे ४ घासून जाणे, लागून जाणे

Settle

१ वसती करणे, वसाहत करणे २ (to fix by agreement as, a price) निश्तित करणे, ठरवणे ३ (to close by payment) (हिशेब, कर्ज इत्यादि) चुकता करणे ४ (as, an account) हिशेब नक्की करणे ५ Law (to conclude a lawsuit by agreement between the parties usu.out of court) समझोता करणे ६ (गाळ इत्यादि)खाली बसणे ७ व्यवस्था करणे ८ जम बसणे

Sling

१ ओळखंबे (न.), झोळी (स्त्री.) २ शिंके (न.) ३ गोफण (स्त्री.), v.t. १ गोफणीने मारणे २ फेकणे (as in : mud-slinging चिखलफ़ेक)

Smash

१ ( to break utterly to pieces) चक्काचूर करणे, चक्काचूर होणे, आपटून चुराडा होणे २ (to rout utterly and disorganise) पुरता बिमोड करणे ३ (in case of tennis badminton) तडाखा हाणणे