सर्च इंजिनचा खुलासा..

हे सर्च इंजिन 'शासन व्यवहार शब्दकोश' शोधायला विशेष उपयोगी पडावे म्हणून बनवले आहे. सदर सर्च इंजिनमधे 'प्रगत वापरकर्त्यांसाठी' विशेष सुविधा आहेत. खालील विषय एकदा पूर्ण वाचा -

  • मुख्यत्वे अख्खे शब्द तात्काळ शोधता येतात. आपण ३ अक्षरे टाइप केलीत की 'सजेशन इंजिन' काम चालू करते व ती अक्षरे/शब्द असलेल्या व अधिकाधिक शोधल्या गेलेल्या १० प्रमुख नोंदींची यादी आपल्याला दिसते. आपण जसे पुढे टाइप कराल तशी ही यादी नवनविन नोंदी आपल्याला दाखवते. आपल्याला अपेक्षित नोंद यादीत आढळल्यास आपण त्यावर क्लिक करून ती सविस्तर पाहू शकता किंवा कॉपी करून घेऊ शकता. जर आपल्याला अपेक्षित नोंद दिसतच नसेल, तर सरळ 'एंटर' बटन दाबून आपण सर्व उपलब्ध नोंदी पाहू शकता.
  • जेव्हा तुम्ही दोन शब्द लिहिता तेव्हा दोन्ही शब्द असलेल्या नोंदी निवडल्या जातात. जसे की जेव्हा तुम्ही 'जमा खर्च' असे टाइप करता तेव्हा हे दोन्ही शब्द असलेल्या सर्व नोंदी शोधल्या जातात. ह्या 'जमा' व 'खर्च' ह्यातले काय आधी व काय नंतर ह्याचा फरक पडत नाही की दोघांच्या मधे काय ह्याचा देखील फरक पडत नाही.
  • जर आपल्याला 'जमा' किंवा 'खर्च' ह्यापैकी कुठलाही एक शब्द असलेल्या नोंदी पहायच्या असतील तर मधे "OR" टाइप करा - जमा OR खर्च
  • नोंदी पहात असताना जर आपल्याला त्यात काही शब्द असलेल्या नोंदी गाळायच्या असतील तर त्या शब्दा च्या मागे वजा (-) चिन्ह वापरा, उदा. '-गोषवारा'. आपल्याला 'जमा खर्च -गोषवारा' असे टाइप केल्या वर 'जमा' व 'खर्च' असलेल्या व 'गोषवारा' शब्द गाळलेल्या सर्व नोंदी मिळतील.
  • आपण एकच नोंद शोधताना मराठी व इंग्रजी शब्द मिक्स करूनही शोधू शकता किंवा गाळू शकता जसे की 'जमा खर्च -गोषवारा -expenditure'
  • अख्खे वाक्य जसे च्या तसे शोधायचे असेल तर ते दोन अवतरण चिन्हांमधे (") लिहा उदा. "खाते बदलण्याची सूचना". मग हे अख्खे वाक्य असलेल्या सर्व नोंदी मिळतील