आद्याक्षर सूची (212)

The above civic amenities are provided in the new gaothans of Project Displaced Persons through the agency of the Zilla Parishad concerned and the cost thereof is met from the respective project funds. The percentage of expenditure to be incurred by the I

वरील नागरी सुविधा, प्रकल्पविस्थापित व्यक्तींच्या नवीन गावठाणात संबंधित जिल्हा परिषदेमार्फत पुरविल्या जातात व त्यांचा खर्च संबंधित प्रकल्पाच्या निधीतून भागविला जातो. पाटबंधारे विभागाने ह्या सुविधांकरिता करावयाच्या खर्चाचे प्रमाण सध्या प्रकल्पनिधीच्या ०.१५ टक्के ठरविण्यात आले आहे.

The Chairman of the Maharashtra Public Service Commission in his latest letter to the Chief Secretary has strongly protested against the continuance of non-Public Service Commission candidates in Government service and stated that this point would be comm

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी मुख्य सचिवांना नुकतेच एक पत्र लिहून त्यात लोकसेवा आयोगाने न निवडलेले उमेदवार शासकीय सेवेत चालू ठेवण्याबद्दल आपली तीव्र नापसंती व्यक्त केली आहे आणि आयोगाच्या वार्षिक अहवालात या मुद्यावर टीकाटिप्पणी केली जाईल असे म्हटले आहे.

The above facts may be brought to the notice of the Honourable Member and he may be requested to withdraw the resolution. Otherwise, the resolution may be opposed.

वरील वस्तुस्थिती माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणून त्यांना हा ठराव मागे घेण्याची विनंती करावी. त्यांनी तसे न केल्यास ठरावाला विरोध करावा.

The norms for additional staff-field and/or supervisory will be worked out by the I. E. & L. Department in consultation with the Finance Department.

ह्याकरिता क्षेत्रीय आणि /किंवा पर्यवेक्षकीय कर्मचारीवर्ग किती प्रमाणात लागेल ते उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने वित्त विभागाच्या सल्ल्याने ठरवावे.

The question of continuance or otherwise of the general ban on opening of new secondary schools was discussed in the meeting of the Cabinet held on ..................

नवीन माध्यमिक शाळा उघडण्यावर घातलेली सार्वत्रिक बंदी चालू ठेवावी किंवा कसे या प्रश्नावर दि. .............. रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

There is always some time-lag between the date on which vacancies/requirements are reported by the Offices and the date on which the Public Service Commission selected candidates are actually available for appointment.

संबंधित कार्यालये, रिकामी पदे किंवा आवश्यक उमेदवारांची संख्या कळवितात ती तारीख व लोकसेवा आयोगाने निवडलेले उमेदवार प्रत्यक्षात उपलब्ध होतात ती तारीख यामध्ये नेहमीच अंतर पडते.

To overcome this difficulty it has been proposed to approach the Cabinet for guaranteeing these loans before receipt of intimation from the L. I. C.

ही अडचण निवारण्यासाठी, आयुर्विमा महामंडळाकडून सूचना येण्यापूर्वीच या कर्जाबाबत हमी देण्याची व्यवस्था करावी अशी मंत्रिमंडळाला विनंती करण्याचे ठरवले आहे.

The Finance Department also takes objection for post facto sanction and the Public Works Department is put in an embarrassing position.

वित्त विभागाकडून देखील कार्योत्तर मंजुरीस हरकत घेण्यात येते आणि त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची परिस्थिती अवघड होते.

The absence of a distinct employer-employee relationship as in the industrial field is the characteristic feature of agricultural sector which is dominated by small holders.

औद्योगिक क्षेत्रात असतात तसे मालक व नोकर यांचे स्पष्ट परस्पर संबंध विशेषेकरून अल्पभूधारकाच्या वर्चस्वाखालील कृषिक्षेत्रात आढळून येत नाहीत.

The Finance Department has observed that the funds which are indicated for the scheme will have to be found within the plan ceiling of the Industries and Mining Sectors.

उद्योग व खाणकाम या क्षेत्रांसाठी पंचवार्षिक योजनेत जी खर्चाची मर्यादा घालून दिली त्यातून या योजनेसाठी लागणारा खर्च भागवावा असे मत वित्त विभागाने व्यक्त केले आहे.

The Finance Department which was consulted in the matter has accepted the request of Board of Management with the following observation :-

ह्या बाबतीत वित्त विभागाशी विचारविनिमय करण्यात आला व त्या विभागाने व्यवस्थापन मंडळाची विनंती खालील अभिप्रायांसह मान्य केली :-

The main bottleneck in the utilisation of the irrigation potential is that the land development works are not executed simultaneously with the irrigation canals and distribution works.

सिंचनक्षमता उपयोगात आणण्यामागील मुख्य अडचण अशी की जलसिंचन कालव्यांची कामे व पाणी-वाटपाची कामे ह्यांच्याबरोबर एकाचवेळी भू-विकासाची कामे उरकली जात नाहीत.

These suggestions together with the views of the Department were considered by the Cabinet Sub-Committee on 6th August 1975, and the appended draft Bill is the outcome of all these.

या सूचना आणि विभागाचे अभिप्राय यांवर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दि. ६ ऑगस्ट १९७५ रोजी विचार केला, सोबत जोडलेला विधेयकाचा मसुदा हा त्यातूनच निष्पन्न झालेला आहे.

The main emphasis during the Five Year Plans has been to ensure all round development of agricultural economy and to raise the standard of living of the rural people.

पंचवार्षिक योजनामध्ये कृषि अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासावर आणि ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावण्यावर मुख्यतः भर देण्यात आलेला आहे.

This Department has no objection to consider this proposal, if additional funds required for the purposes, are made available to it.

या प्रयोजनांसाठी आवश्यक असलेला जादा निधी विभागास उपलब्ध करून देण्यात आला, तर हा प्रस्ताव विचारात घेण्यास या विभागाची हरकत नाही.

The Conciliation Officer is proposed to be vested with powers to decide the claims for....and if necessary, to recover it as arrears of land revenues.

....च्या मागणीचा निर्णय देण्याचे आणि आवश्यक असल्यास ती रक्कम जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचे अधिकार समेट अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे योजिले आहे.

The first step in the direction of .................. was taken by Government after consideration of the report of the committee appointed by it under the Chairmanship of Shri. ..................................................................... to study

महाराष्ट्र राज्यात ................ यांच्या रोजगाराच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी श्री. ..................................... यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने नेमलेल्या समितीच्या अहवालांचा विचार केल्यानंतर शासनाने .................................... च्या दृष्टीने प्रथमच कार्यवाही केली.

The scheme may be treated as District Level Scheme on the basis that in case the District Planning and Development Council, Greater Bombay does not make the requisite provision for funds, a directive will be issued to it by the Planning Department to mak

जर बृहन्मुंबईचे जिल्हा नियोजन व विकास मंडळ आवश्यक त्या निधीची तरतूद करीत नसेल तर आवश्यक ती तरतूद करण्यासाठी नियोजन विभाग, मंडळाला आदेश देईल, या भूमिकेतून ही योजना जिल्हा पातळीवरील योजना मानण्यात यावी.

This Department has no objections to adopt the line suggested by the Planning Department and to request the District Planning and Development Council, Bombay, to make a provision for the recurrent grant that may ultimately be payable to this institution.

नियोजन विभागाने सुचविलेली पद्धती स्वीकारण्यास या विभागाची काहीच हरकत नाही. बृहन्मुंबई जिल्हा नियोजन व विकास मंडळाला, आवर्ती अनुदानाची तरतूद करण्याबद्दलही हा विभाग विनंती करील. कारण शेवटी ही रक्कम या संस्थेलाच द्यावी लागणार आहे.

The L.I.C. has stipulated certain conditions for sanctioning loans for new schemes and preference is given to new schemes for towns where there is no existing piped water supply and augmentation schemes will be considered later.

आयुर्विमा महामंडळाने नवीन योजनांकरिता कर्ज मंजूर करण्यासाठी काही शर्ती घातल्या असून ज्या शहरांत नळाने पाणी पुरवठा करण्याची सोय नाही अशा शहरांतील नवीन योजनांना अग्रक्रम दिला आहे. पाणीपुरवठा वाढवावयाच्या योजना नंतर विचारात घेण्यात येणार आहेत.

The main work in this is that the canal system requires to be remodelled and lined with a view to reduce percolation losses.

पाणी झिरपण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्याच्या हेतूने कालवा-पद्धतीची पुनर्रचना करणे व त्याला अस्तर लावणे हे यातील मुख्य काम आहे.

The Secretary may kindly see before these papers are submitted to EPC for sanctioning the advance from CF to the extent of Rs. .............................

आकस्मिकता निधीतून रु. ....................... ची आगाऊ रक्कम मंजूर करण्यासाठी ही फाईल व्यय अग्रक्रम समितीला प्रस्तुत करण्यापूर्वी सचिवांनी कृपया पहावी.

The Bill may be introduced in the Legislature in the ensuing session but it may be taken up for consideration only after the Government of India’s administrative approval is received.

हे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करावे. परंतु, भारत सरकारची प्रशासनिक मान्यता मिळाल्यावरच त्यावर चर्चा करण्यात यावी.

The bill seeks to provide for the security of employment of agricultural workers through a scheme of preferences for employment of workers who had worked on the same land during the previous season, etc.

शेतमजुरांनी आधीच्या हंगामात ज्या जमिनीवर काम केले असेल त्याच जमिनीवर त्यांना अग्रक्रम योजनेनुसार सुरक्षित रोजगार मिळावा हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.

The Law and Judiciary Department has agreed to convert the Bill into an ordinance on receipt of approval of Cabinet to this proposal.

या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर, या विधेयकाचे अध्यादेशात रूपांतर करण्याचे विधि व न्याय विभागाने मान्य केले आहे.

The suggestions made by the Lok Ayukta were examined in the G. A. D. in consultation with the L.&J. D. in the light of the comments of the Governor.

लोकायुक्तांनी केलेल्या सूचना, सामान्य प्रशासन विभागाने, विधि व न्याय विभागाशी विचारविमर्श करून व राज्यपालांची टीकाटिप्पणी लक्षात घेऊन तपासल्या आहेत.

The Bill was introduced in the State Legislature on.... but the Bill could not be discussed as the Assembly Session was adjourned.

हे विधेयक, राज्य विधानमंडळापुढे ....... रोजी मांडण्यात आले होते. परंतु विधानसभेचे अधिवेशन तहकूब झाल्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

The draft Bill need not be brought before the Cabinet unless there are any substantial changes in the proposals as contained in this note and approved by the Cabinet.

या टिप्पणीत दिलेल्या प्रस्तावांत फार मोठे बदल नसतील आणि मंत्रिमंडळाने ती मान्य केली असेल तर विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळापुढे मांडण्याची गरज नाही.

The principle behind CADA i.e. the land development and development of agricultural infrastructure should go hand in hand with the development of irrigation can be seen very clearly in this project.

भूविकास व कृषिविषयक पायाभूत सोयींचा विकास हा पाटबंधाऱ्यांच्या विकासाबरोबरच झाला पाहिजे हे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यामागील तत्त्व या प्रकल्पात स्पष्टपणे दिसून येते.

The Maharashtra Public Service Commission is thus the only source of recruitment to ministerial post in the Secretariat Departments and Offices in Greater Bombay.

अशा रीतीने मंत्रालयीन विभागांत व बृहन्मुंबईतील कार्यालयांतील लिपिकवर्गीय पदांवर केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच नेमणूका होतात.

That Department has, however, advised that the Government will have to take decision to issue such ordinance and convince the Governor about the need for ordinance and amending the Act urgently.

तथापि, त्या विभागाचा सल्ला असा आहे की, अशा प्रकारचा अध्यादेश काढण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल आणि असा अध्यादेश काढून अधिनियमात तातडीने सुधारणा करण्याची गरज राज्यपालांना पटवून द्यावी लागेल.

To treat the programme as a State Level Scheme instead of District Level Scheme so that allocation of funds and arranging the programme of execution can be done in a manner that will ensure speedy execution and economy.

हा कार्यक्रम जिल्हा पातळीवरील योजनेऐवजी राज्य पातळीवरील योजना म्हणून मानण्यात यावा म्हणजे तो लौकर व काटकसरीने पार पाडण्याच्या दृष्टीने निधीचे वाटप करता येईल व त्याच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम आखता येईल.

The tax levied under the ................... Act is not based on income except in the case of salary earners, in which case also the rate of tax is based on income groups and not on specific income.

.............. या अधिनियमानुसार बसवण्यात आलेला कर, हा वेतन मिळवणाऱ्या व्यक्ती सोडून इतरांच्या बाबतीत, उत्पन्नावर आधारलेला नाही. वेतन मिळवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा तो उत्पन्न गटांवर आधारलेला आहे, विशिष्ट उत्पन्नावर नव्हे.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)