आद्याक्षर सूची (26)

. (1) A (238) B (60) C (145) D (177) E (91) F (110) G (28) H (49) I (277) J (18) K (12) L (86) M (117) N (56) O (69) P (116) Q (10) R (68) S (139) T (212) U (31) V (21) W (66) Y (5) Z (2)

That Department has, however, advised that the Government will have to take decision to issue such ordinance and convince the Governor about the need for ordinance and amending the Act urgently.

तथापि, त्या विभागाचा सल्ला असा आहे की, अशा प्रकारचा अध्यादेश काढण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल आणि असा अध्यादेश काढून अधिनियमात तातडीने सुधारणा करण्याची गरज राज्यपालांना पटवून द्यावी लागेल.

The tax levied under the ................... Act is not based on income except in the case of salary earners, in which case also the rate of tax is based on income groups and not on specific income.

.............. या अधिनियमानुसार बसवण्यात आलेला कर, हा वेतन मिळवणाऱ्या व्यक्ती सोडून इतरांच्या बाबतीत, उत्पन्नावर आधारलेला नाही. वेतन मिळवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा तो उत्पन्न गटांवर आधारलेला आहे, विशिष्ट उत्पन्नावर नव्हे.

The above civic amenities are provided in the new gaothans of Project Displaced Persons through the agency of the Zilla Parishad concerned and the cost thereof is met from the respective project funds. The percentage of expenditure to be incurred by the I

वरील नागरी सुविधा, प्रकल्पविस्थापित व्यक्तींच्या नवीन गावठाणात संबंधित जिल्हा परिषदेमार्फत पुरविल्या जातात व त्यांचा खर्च संबंधित प्रकल्पाच्या निधीतून भागविला जातो. पाटबंधारे विभागाने ह्या सुविधांकरिता करावयाच्या खर्चाचे प्रमाण सध्या प्रकल्पनिधीच्या ०.१५ टक्के ठरविण्यात आले आहे.

The above facts may be brought to the notice of the Honourable Member and he may be requested to withdraw the resolution. Otherwise, the resolution may be opposed.

वरील वस्तुस्थिती माननीय सदस्यांच्या निदर्शनास आणून त्यांना हा ठराव मागे घेण्याची विनंती करावी. त्यांनी तसे न केल्यास ठरावाला विरोध करावा.

The absence of a distinct employer-employee relationship as in the industrial field is the characteristic feature of agricultural sector which is dominated by small holders.

औद्योगिक क्षेत्रात असतात तसे मालक व नोकर यांचे स्पष्ट परस्पर संबंध विशेषेकरून अल्पभूधारकाच्या वर्चस्वाखालील कृषिक्षेत्रात आढळून येत नाहीत.

The Bill may be introduced in the Legislature in the ensuing session but it may be taken up for consideration only after the Government of India’s administrative approval is received.

हे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करावे. परंतु, भारत सरकारची प्रशासनिक मान्यता मिळाल्यावरच त्यावर चर्चा करण्यात यावी.

The bill seeks to provide for the security of employment of agricultural workers through a scheme of preferences for employment of workers who had worked on the same land during the previous season, etc.

शेतमजुरांनी आधीच्या हंगामात ज्या जमिनीवर काम केले असेल त्याच जमिनीवर त्यांना अग्रक्रम योजनेनुसार सुरक्षित रोजगार मिळावा हे या विधेयकाचे उद्दिष्ट आहे.

The Bill was introduced in the State Legislature on.... but the Bill could not be discussed as the Assembly Session was adjourned.

हे विधेयक, राज्य विधानमंडळापुढे ....... रोजी मांडण्यात आले होते. परंतु विधानसभेचे अधिवेशन तहकूब झाल्यामुळे या विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)