as may be necessary
आवश्यक असेल त्याप्रमाणे/असे
आवश्यक असेल त्याप्रमाणे/असे
विहित करण्यात येईल असा/त्याप्रमाणे
फेरफार केल्याप्रमाणे
शक्य तितके जवळपास
शक्य तितके जवळपास...... इतके
जास्तीत जास्त शक्य होईल तितपत
परिस्थितीनुसार शक्य असेल तेथवर
अधिकारतः, हक्क म्हणून, हक्काने
सध्या चालू असलेल्या कार्यपद्धतीनुसार, आयुर्विमा महामंडळाकडून ही कर्जे मंजूर झाल्यानंतरच, त्या कर्जाबद्दल हमी देण्याचा प्रश्न मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात आला आहे.
प्रस्तावित केल्याप्रमाणे
-च्या बाबत, -च्या संबंधात
टंचाईची परिस्थिती जाहीर करण्याच्या बाबतीत शासनाने ठरवून दिलेली तत्त्वे विचारात घेता, ज्या भागात हलाखीची परिस्थिती असल्याची चिन्हे स्पष्ट दिसतात ते भाग टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करावे लागतील.
टंचाईग्रस्त भागांत रोजगार हमी योजनेखाली हाती घ्यावयाच्या कामांची निवड करताना काहीसे उदार धोरण स्वीकारावे लागेल. किंवा टंचाईग्रस्त भागांत रोजगार हमी योजनेखाली कोणती कामे हाती घ्यावयाची हे ठरवताना काहीसे उदार धोरण स्वीकारावे लागेल.
टंचाईविषयक नियमपुस्तिकेच्या तरतुदींप्रमाणे, टंचाईची परिस्थिती रीतसर जाहीर करावयाची की नाही हे ठरवण्यासाठी शेतीच्या हंगामाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पुस्तिकेच्या परिच्छेद ३४ मध्ये दिलेल्या निरनिराळ्या बाबींची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे.
ग्रामीण भागात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेत रोजगाराच्या सुरक्षिततेची उत्तम तरतूद केली आहे. ही योजना राज्य शासनाच्या सामाजिक व आर्थिक धोरणाचे एक कायमचे अंग बनले असून ग्रामीण भागातील मजुरांना उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या मजुरीचे दर यांवर ह्या योजनेचा खूपच चांगला परिणाम झाला आहे.
सुधारल्याप्रमाणे
लवकरात लवकर
होईल तितक्या लवकर
व्यवहार्य होईल तितक्या लवकर
सुचवल्यानुसार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725