आद्याक्षर सूची (210)

T-score cf. z-score

z-प्राप्तांक [मेकॉल यांनी १९२३ मध्ये सुचविलेल्या पद्धतीप्रमाणे एखाद्या कसोटीतील गुणांचे किंवा प्राप्तांकांचे पुनर्मापनीकरण करून मिळवलेले चलमूल्य. ज्या प्रसामान्य वितरणाचा मध्य ५० आहे व प्रमाण विचलन १० आहे अशा वितरणाच्या विचलांत प्राप्तांकांचे रूपांतरण करणे हे या पद्धतीचे सार आहे. म्हणून T प्राप्तांकांची ० ते १०० ही कक्षा व प्रसामान्य वितरणातील मध्याच्या प्रत्येक बाजूला ५ प्रमाण विचलने घेऊन येणारी कक्षा या सममूल्य असतात.]

two way classification with unequal numbers

असमान संख्यात्मक द्विमार्गी वर्गीकरण [दोन लक्षणांनुसार वर्गीकरण केलेल्या निरीक्षणांच्या द्विमार्गी कोष्टकांतील प्रत्येक घरात निरीक्षणांच्या संख्या असमान असल्यास, त्या वर्गीकरणास 'असमान संख्यात्मक द्विमार्गी वर्गीकरण' असे म्हणतात.]

type bias

प्रकारजन्य अभिनति [घटक श्रेणीसाठी विशिष्ट प्रकारची सरासरी वापरल्याने निर्देशाकांत उद्‌भवू शकणारी अभिनती. प्रत्यक्षातले अभिनतीचे अस्तित्व हे सरासरी काढलेल्या श्रेणीचे स्वरूप आणि चर्चेच्या संदर्भात केला जाणारा अभिनतीचा अर्थ या दोन्हींवर साहजिकच अवलंबून असते.]

terminal decision

समापन निर्णय [अनुक्रमी प्रकारच्या नमुनानिवड प्रायोजनात नमुनानिवडीची प्रक्रिया थांबवणारा निर्णय. उदाहरणार्थ, स्वीकृति परीक्षणांच्या एकवार नमुनानिवड प्रायोजनात दोन निर्णय संभवतात आणि दोन्ही समापन निर्णय असतात: परीक्षण केलेला गठ्ठा स्वीकारणे किंवा नाकारणे. जर प्रायोजनात तिसऱ्या प्रकारच्या निर्णयाची, म्हणजे नमुनानिवड चालू ठेवण्याची सोय असली, तर हा तिसऱ्या प्रकारचा निर्णय समापन निर्णय होणार नाही. ]

tied double change over design

दुहेरी क्रमबदल संकल्पन [t उपचारांचा क्रमशः वापर आणि पुढच्या अवधीत टिकून राहणारे परिणाम अशा परिस्थितीसाठी फेडेरर आणि फेरिस (१९५६) यांनी सुचवलेले प्रायोगिक संकल्पन. प्रत्यक्ष आणि अवशिष्ट अशा दोन्ही परिणामांचे आकलन करता येते. संकल्पनाच्या रचनेत (t-1) स्वतंत्र (orthogonal) लॅटिन चौरसांचा उपयोग करतात.]

Takacs process

(also called virtual waiting time process) टकाक्स प्रक्रम [प्वॉसाँ आदान आणि सेवा कालाचे वितरण सर्वसाधारण असलेली एक सेवाकेंद्र रांग पद्धती विचारात घेऊन टकाक्स (१९५५) यांनी प्राप्त केलेला संतत मार्कोव्ह प्रक्रम. जर X (t) ची व्यख्या, t या वेळी आलेल्या ग्राहकाला सेवेची सुरुवात होईपर्यंत थांबावा लागणारा अवधी अशी केली तर X (t) ला टकाक्स किंवा वास्तव प्रतीक्षा अवधि प्रक्रम म्हणतात.]

tolerance factor

सह्यता गुणांक [प्रत नियमनात वरच्या आणि खालच्या सहनमर्यादेमधील अंतराळाला उत्पादनाच्या विचरणशीलतेच्या एखाद्या मापाने भागून येणारे उत्तर (बहुधा हे माप प्रमाण विचलन असते) कधीकधी, आणि विशेषतः मोजलेल्या यादृच्छिक चलाचे वितरण सममित असते तेव्हा, या भागाकाराची निमपट घेतात.]

tandem queues

अनुवर्ती रांगा cf. series queues [एका रांग पद्धतीच्या सेवा टप्प्याचे प्रदान हे दुसऱ्या पद्धतीच्या सेवा टप्प्याचे थेट आदान असते अशी परिस्थिती (राईश १९५७). श्रेणीबद्ध रांगा (series queues) ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे.]

tilling

n. प्ररेखन (न.) [संगम विश्लेषणात किंवा गुच्छचित्र विश्लेषणात वापरले जाणारे तंत्र. समाश्रयण समीकरणातील चलांच्य सर्व शक्य उपसंचांत उद्‌भवणाऱ्या सर्व प्राथमिक समाश्रयणांची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी याचा उपयोग करतात.]

tandem tests

अनुवर्ती कसोट्या [वॉल्ड-(Wald) प्रकारच्या दोन अनुक्रमी संभाव्यता गुणोत्तर कसोट्यांच्या क्रमिकेसाठी आब्राम्सन (१९६६) यांनी सुचविलेली संज्ञा. पहिली कसोटी X1 किंवा X2 या दोन चलांपैकी एका चलावर करतात. दुसरी कसोटी उरलेल्या चलावर करतात. ती पहिल्या कसोटीच्या परिणामावर अवलंबून असू शकते.]

tetrachoric correlation

चौघरी सहसंबंध [प्रसामान्य वितरण असणाऱ्या दोन चलांमधील गुणाकार परिबल सहसंबंधाशी सममूल्य अशा ρ या प्राचलाचा आकल. हा आकल २ × २ कोष्टकात सामावलेल्या माहितीपासून किंवा त्या चलांच्या द्विचल वितरणाच्या दुहेरी द्वंद्वभाजनापासून मिळवतात. ]

time antithesis cf. factor antithesis

घटक व्युत्क्रमण सूत्र [एखाद्या निर्देशांक सूत्रातील आधारकाल आणि दिलेला काल दाखवणाऱ्या पादांकांची अदलाबदल करून व मग व्युत्क्रमण घेऊन मिळणारे निर्देशांक सूत्र.] (शिवाय पहा : factor antithesis)

trough

n. खळगा (पु.) [पृथक कालक्रमिकेत शेजारच्या दोन्ही बाजूंच्या निरीक्षणापेक्षा कमी असते ते निरीक्षण. संतत कालक्रमिकेत क्रमिका लघुतम होते तो बिंदू.]

tetrachoric function

चौघरी फल [(शेबिशेव-हरमाइट) बहुघाती राशींशी संबंधित असलेले आणि चौधरी सहसंबंध गुणांकाच्या संगणनेत वापरले जाणारे फल.r व्या कोटिकेच्या फलाची व्याख्या अशी करता येईल. येथे हा या प्रमाणित प्रसामान्य चलाचा (r-1) Hr-1(x) (r-1) च्या कोटिकेची शेबिशेव-हरमाइट बहुघाती राशी आहे.]

total correlation

सकल सहसंबंध cf. net correlation [दोन यादृच्छिक चलांमधील शून्य कोटिका सहसंबंध, म्हणजेच सामाईक विचरण काढून घेतल्यावर उरलेल्या अवशिष्टांमधील सहसंबंध नव्हे, तर मूळ सामग्रीमधील सहसंबंध.]

true regression

यथार्थ समाश्रयण [हा शब्दप्रयोग कधीकधी नमुन्याच्या संदर्भात वापरतात. त्याचा अर्थ असा होतो की निरवलंबी चलाच्या अवलोकनात दोष नसते तर जे समाश्रयण मिळाले असते ते समाश्रयण.]

time homogeneous process

(also temporally homogeneous process or called homogeneous time process) कालिक एकविध प्रक्रम [एखाद्या यादृच्छिक प्रक्रमात कोणत्याही दोन क्षणीं मिळणाऱ्या दोन स्थितींमधील संक्रमण संभाव्यता त्या क्षणांमधील कालखंडावरच अवलंबून रहात असेल तर त्या प्रक्रमास 'कालिक एकविध प्रक्रम' असे म्हणतात. हेच खालील सूत्राने सांगता येईल : जर Pt1, t2 (I,j) = P (χ2) = j χ (t1) = i असेल तर ह्या प्रक्रमात Pt1, t2 (I,j)= P0, t1, t2 (I,j) असते. येथे t2 > t1 आहे.]

triangle test

त्रिकुटी कसोटी cf. duo trio test [या कसोटीत परीक्षकाला तीन वस्तू दाखवतात. त्यांपैकी दोन सारख्या असतात आणि परीक्षक वेगळी वस्तू निवडण्याचा प्रयत्न करतो.]

type A distribution

वितरण प्रकार - A [सांसर्गिक वितरण म्हणून वापरण्यासाठी नेमन (१९३३) यांनी सुचवलेले संयुक्त प्वॉसाँ वितरणाचे रूप. वितरण फलाच्या ग्राम शार्लीए प्रकार-A विस्ताराहून ते वेगळे आहे. पृथक यादृच्छिक चल X ची 0, 1, 2, ......., ही मूल्ये असून j या मूल्याची संभाव्यता च्या विस्तारातील tj चा सहगुणक होय.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)