आद्याक्षर सूची (307)

diffusion index

विसरण निर्देशांक [दिलेल्या क्षणी एखाद्या कालक्रमिकेच्या संचातील चढत्या क्रमिका समुच्चयाच्या प्रमाणासाठी बर्न्स आणि मूर (१९५०) यांनी सुचवलेली संज्ञा.]

Dvoretsky's stochastic approximation theorem

व्होरेट्‌स्की यादृच्छिक समीपन प्रमेय [अध्यारोपित यादृच्छिक दोष रूपांतरणाच्या अभिसरणाविषयीचे सर्वसाधारण प्रमेय. हे प्रमेय रॉबिन्स-मन्रो आणि कीफर वुल्फोविट्‌झ यांच्या यादृच्छिक समीपन पद्धतीत वापरतात.]

decapitated

adj. शून्यरहित cf. zero-truncated [जर एखाद्या पृथक चल वितरणाची कक्षा 0,1,2,.... अशी असेल आणि प्रत्यक्षात 0 हे मूल्य मिळत नसेल तर त्या चलाची कक्षा शून्यरहित धरावी लागते, अशा चलाच्या वितरणाला शून्यरहित वितरण म्हणतात.]

defective probability measure

न्यून संभाव्यता मान [संभाव्यता वितरणात संबंधित अंतराळामध्ये, एकूण संभाव्यता बेरीज (p) 'एक' येईल अशाप्रकारे प्रत्येक घटनेला संभाव्यता नेमून दिलेली असते. परंतु, प्रत्यक्षात काही वेळा ही बेरीज (p) एकापेक्षा कमी येते. अशा वेळी त्या संभाव्यता मानास 'न्यून संभाव्यता मान' म्हणतात. त्यातील न्यूनता (1-p) एवढी असते.]

dynamic model cf. unitemporal model

कालनिरपेक्ष प्रतिमान [अर्थमितिशास्त्रातील प्रतिमानात पुढीलपैकी एक किंवा दोनही गुणधर्म असले तर त्याला 'गतिक प्रतिमान' म्हणतात : (१) संरचनात्मक समीकरणांतील निदान एका चलाची मूल्ये वेगवेगळ्या कालबिंदूंची असतात किंवा त्या मूल्याची एक कालक्रमिका बनते ; (२) निदान एका समीकरणात कालाचे फल असते. जर पहिला गुणधर्म असला तर अशा प्रणालीला कधीकधी भिन्नकालिक प्रतिमान म्हणतात व एकही गुणधर्म नसला, तर कालनिरपेक्ष प्रतिमान म्हणतात.]

descriptive index

वर्णात्मक निर्देशांक [चलाच्या प्रत्येक किंमतीबाबत संबंध दर्शविणारा निर्देशांक इतर निर्देशांक फक्त समुच्चयाशी किंवा मध्याशी संबंधित असतात. पॅरेटोचा α किंवा गिनीचा δ हे वर्णनात्मक निर्देशांक होत.]

discontinuous process

(also called discrete process or called discontinuous parameter process) असंतत प्रक्रम [असंतत प्राचल t वर आधारित असलेल्या यादृच्छिक प्रक्रमाला कधीकधी या संज्ञा वापरतात. t हे प्राचल असंतत असले तरी त्यावर आधारलेला यादृच्छिक प्रक्रम हा असंतत असेलच असे नाही. हा गोंधळ होऊ नये म्हणून या तिन्ही संज्ञा शक्यतो टाळलेल्या बऱ्या.]

duo-trio test cf. triangle test

त्रिकुटी कसोटी [ या कसोटीत तीन वस्तूंपैकी दोन सारख्या असतात व तिसरी वेगळी असते. या तिन्ही वस्तू परीक्षकांस देतात. परीक्षक त्यांतील तिसरी (वेगळी) वस्तू, सारख्या वस्तूंच्या दिलेल्या गुणधर्मावरून ओळखण्याचा प्रयत्न करतो.]

distribution free method cf. non parametric method

अप्राचलीय पद्धति [ज्यावेळी एखादी संख्याशास्त्रीय पद्धती आधारभूत वितरणाच्या रूपावर अवलंबून नसते तेव्हा त्या पद्धतीला 'वितरण-निरपेक्ष पद्धती' म्हणतात. उदाहरणार्थ, मध्यकाचे विश्वास अंतराळ द्विपद विचरणावर आधारलेले असते, तेव्हा ते कोणत्याही संतत वितरणासाठी ग्राह्य असते. परिकल्पनांच्या कसोटीच्या पद्धतीसाठी याचा अर्थ असा होतो की ती कसोटी मूळ परिकल्पनेच्या वितरणावर अवलंबून नाही. वितरण-निरपेक्ष अनुमान किंवा कसोट्या यांना उद्देशून कधीकधी प्राचलनिरपेक्ष हा शब्द वापरतात पण हा वापर गोंधळात टाकणारा असल्याने टाळावा.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)