distribution free method cf. non parametric method

अप्राचलीय पद्धति [ज्यावेळी एखादी संख्याशास्त्रीय पद्धती आधारभूत वितरणाच्या रूपावर अवलंबून नसते तेव्हा त्या पद्धतीला 'वितरण-निरपेक्ष पद्धती' म्हणतात. उदाहरणार्थ, मध्यकाचे विश्वास अंतराळ द्विपद विचरणावर आधारलेले असते, तेव्हा ते कोणत्याही संतत वितरणासाठी ग्राह्य असते. परिकल्पनांच्या कसोटीच्या पद्धतीसाठी याचा अर्थ असा होतो की ती कसोटी मूळ परिकल्पनेच्या वितरणावर अवलंबून नाही. वितरण-निरपेक्ष अनुमान किंवा कसोट्या यांना उद्देशून कधीकधी प्राचलनिरपेक्ष हा शब्द वापरतात पण हा वापर गोंधळात टाकणारा असल्याने टाळावा. ज्या परिकल्पनांत प्राचलविषयी ठाम विधान केलेले नसते अशाच परिकल्पनांच्या वर्णनात 'प्राचल-निरपेक्ष' हा शब्द वापरणे अधिक चांगले.]