As both the Houses of the State Legislature are not in session and it is necessary to take an immediate action to make a new law for the purpose aforesaid, it is proposed to promulgate an ordinance.

राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसल्यामुळे आणि वरील प्रयोजनासाठी नवीन कायदा तयार करण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक असल्याने एक अध्यादेश काढावा असे सुचवण्यात येते आहे.

As desired by the Chief Secretary, the note of Urban Development Department was examined in the P. W. & H. D. and the following comments are submitted for further consideration of Government :

मुख्य सचिवांनी सांगितल्याप्रमाणे नगर विकास विभागाच्या टिप्पणीचा सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण विभागात बारकाईने विचार केल्यानंतर शासनाच्या निर्णयासाठी पुढील अभिप्राय सादर करण्यात आहे आहेत :

As directed by Minister (Law), the suggestions were further discussed with the Advocate General. The latter was of the view that grievances should be removed from the jurisdiction of the Lok Ayukta and Up-Lokayukta altogether.

विधिमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे, या सूचनांबाबत महाअधिवक्ता यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली. त्यांच्या मते, गाऱ्हाण्यांच्या सदरात मोडणारी प्रकरणे लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कार्यकक्षेतून काढून टाकण्यात यावीत.