According to item 18 of the Second Schedule read with rule 9 of the Rules of Business, it is necessary to bring Reports of the Public Accounts Committee before the Council of Ministers.

दुसऱ्या अनुसूचीतील बाब क्रमांक १८ व कार्य नियमावलीतील नियम क्रमांक ९ अनुसार लोक लेखा समितीचे अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवणे आवश्यक आहे.

According to the policy adopted by Govt. since the year 1974-75, relief works for providing employment to the agriculturists & agricultural labourers from the scarcity affected areas are undertaken under the E. G. S.

शासनाने १९७४-७५ पासून स्वीकारलेल्या धोरणानुसार टंचाईग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजूर ह्यांना रोजगार पुरवण्यासाठी दुष्काळनिवारणाची कामे “रोजगार हमी योजने” खाली हाती घेतली जातात.

According to the principles underlying CADA, development of field channels should be done simultaneously along-with the project so that, the moment the irrigation potential becomes available it can be utilised for for agriculture.

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्या-मागील उद्देश असा की या प्रकल्पाबरोबरच शेतातील कालव्यांचाही विकास झाला पाहिजे म्हणजे पाटबंधाऱ्यांच्या सोयी उपलब्ध होता-क्षणीच त्यांचा शेतीसाठी वापर करता येईल.

Accordingly, the Cabinet is also requested to approve the proposal of the Subordinate Legislation Committee to provide for the payment of these fees in the Act itself.

त्यानुसार, हे शुल्क भरण्याची तरतूद प्रत्यक्ष कायद्यातच करण्यात यावी हा दुय्यम विधि-विधान समितीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य करावा अशी विनंती आहे.