आद्याक्षर सूची (640)

clearance value-A mathematical expression describing the rate of removal of a metabolite from the plasma (usually ml. per minute).

निपटारा मूल्य-रक्तद्रव्यातून चयापचयजन्य पदार्थ काढून टाकण्याचे प्रमाण सांगणारा एक गणिती वाक्प्रयोग (हे सर्वसाधारणतः मिलि/मिनिट असे दर्शविण्यात येते.)

closures-These are usually the parts of containers which are directly in contact with the contents (i. e. wads plugs, inner caps).

संवृती, झाकणे, निमीलने-औषधिद्रव्याच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारे धारकपात्राचे भाग, उदा. झाकणे, आतील झाकणे, कापसाचा बोळा, इ.

carrier transport-Active transport where a carrier molceule combines with a drug at one membrane surface and dissociates from it at another surface.

वाहक परिवहन-सक्रिय परिवहनात वाहक रेणूचा एका पटल पृष्ठावर औषधाशी संयोग होणे आणि दुसऱ्या पृष्ठावर त्यापासून तो विलग होणे.

capping (of tablets)-Removal or ejection of the top surface of tablet partial or complete separation of the top or bottom crowns of a tablet from the main body of tablet.

छत्रक विलगन-बटिकेचा पृष्ठीय स्तर निघून जाणे किंवा निष्कासित होणे. वटिकेच्या मुख्य भागापासून वटिकेचा वरचा खालचा भाग अंशतः किंवा पूर्णतः विलग होणे.

counter-current mechanism-1 A system of liquid-liquid extractions using multiple tubes for serial extraction from immiscible solvents. 2 A system of exchange of solvents depending on the flow of inputs and outputs in a parallel fashion for some distance.

प्रतिवाह यंत्रणा-१ अमिश्रणीय द्रावकांतून श्रेणीय निष्कर्षण करण्यासाठी अनेक नलिका वापरून द्रव-द्रव निष्कर्षणाची पद्धती. २ काही अंतरापर्यंत (उदा. मूत्रपिंडातली) निविष्टी आणि उद्दिष्टी यांच्या समांतर प्रवाहावर अवलंबून असलेली द्रावकांच्या विनिमयाची पद्धती.

clarification-The term applied in filtration when the solids do not exceed 1.0 percent and filtrate is the primary product.

स्वच्छन-घन पदार्थाचे प्रमाण १ टक्क्या पेक्षा कमी असेल अशा वेळी प्रामुख्याने द्रव पदार्थ मिळवण्याच्या उद्देशाने केलेले गाळण.

creaming of emulsion-Separation of a part of dispersed phase from the emulsion it can be either in upward or downward direction depending upon the type of emulsions.

पायस स्नेहस्तरण, पायसावर मलई धरणे-पायसामधून अपस्कृत प्रावस्थेच्या एका भागाचे विलगन होणे. पायसाच्या प्रकारानुसार वरच्या किंवा खालच्या दिशेने हे विलगन होते.

cross tolerance-If an individual develops tolerance to drugs belonging to a particular group he also shows tolerance to other drugs.

अन्योन्य सह्यता-एखाद्या व्यक्तीमध्ये एका विशिष्ट गटातील औषधाला सह्यता निर्माण झाल्यास त्या व्यक्तीमध्ये त्याच गटाच्या इतर औषधांनाही सह्यता दिसून येते.

cumulation-If a drug is excreted slowly its continuous administration may build up a sufficiently high concentration in the body to produce toxicity. This is termed as cumulation.

संचयन-औषधाचे उत्सर्जन संथपणे होत असल्यास ते सतत दिले गेले तर शरीरात विषाक्तता निर्माण होण्याइतके तीव्र संहतन होते. यालाच संचयन म्हणतात.

cachet-These are small edible containers used for the internal administration of powdered drug. They vary in size from 3/4 to 1.1/8 inch in diameter and consist of two concave pieces of wafers made from flour and water.

काशे-औषधाचे चूर्ण पोटात घेण्यासाठी वापरली जाणारी लहान खाद्य धारके. ही पिठाच्या दोन अंतर्वक्र चकत्यांची बनवलेली असतात.

cumulative curve-Cumulative curve for a given dose of a drug would give the percent of animals responding to that does and to all lower doses.

संचयी वक्र-औषधाच्या ठराविक मात्रेच्या संचयी वक्राद्वारे त्या मात्रेला आणि त्याहून कमी प्रमाणातील मात्रांना प्रतिसाद देणाऱ्या प्राण्यांची टक्केवारी दिली जाते.

competitive antagonism-Here the agonist and the antagonist compete for same receptors and the extent to which the antagonism opposes the pharmacological action of the against will be decided by the relative numbers of receptors occupied by the two compoun

स्पर्धात्मक विरोधिता-येथे प्रचालक व विरोधक एकाच ग्राहींसाठी स्पर्धा करतात आणि प्रचालकांच्या औषधी अभिक्रियेला विरोधिता कोणत्या मर्यादेपर्यंत विरोध करते ते दोन संयुगांनी व्यापलेला ग्राहींच्या सापेक्ष संख्येद्वारे ठरविले जाते.

chromatography-It is a process of separating the components of a mixture by producing different rates of movements of each component in a counter-current system.

वर्णलेखन-प्रतिवाह पद्धतीने प्रत्येक घटकाच्या हालचालीची भिन्न गती निर्माण करून मिश्रणातील घटकांचे विलगन करणे.

container-Packing which contains the medicaments or formulations and is in immediate contact with the drugs. e.g. glass containers plastic containers, metallic containers.

पात्र, धारकपात्र, भांडे-मात्रारूप औषधिद्रव्ये ज्यात प्रत्यक्षात साठवली जातात अशी आवेष्टने. उदा. काचेची, प्लास्टिकची व धातूची पात्रे.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)