आद्याक्षर सूची (648)

addiction-Previously the term ‘addiction’ was used to denote the phenomenon involving both psychological and physical dependence on drugs.

आसक्ति-औषधांची मानसिक व शारीरीक अवलंबिता निर्माण झालेली स्थिती दर्शविण्यासाठी पूर्वी ‘व्यसन’ ही संज्ञा वापरली जात असे.

antithixotropy-Isothermal and comparatively slow loss on standing of a material, of consistency gained through shearing.

प्रतिचालनप्रवाहिता-कर्तनामुळे आलेली सांद्रता, पदार्थ स्थिरावल्यावर समतापी व तुलनात्मक दृष्ट्या हळूहळू जाण्याची क्रिया.

A collection or loss of fully hydrated particles of a colloid system with less solvent bound to them than they had before.

२ राशीभवन-कलिल प्रणालीमधील पूर्णतः सजल कणांचे पूर्वीपेक्षा कमी द्रावकाशी बद्ध अशा स्थितीत समूहन होणे किंवा नाश पावणे.

additive effect- Phenomenon termed when the total action of two or more drugs administered together in equivalent to the summation of their individual actions.

समावेशी परिणाम-एकाच वेळी दिलेल्या दोन किंवा अधिक औषधांचा एकूण परिणाम त्यांच्या प्रत्येकाच्या परिणामांच्या बेरजेएवढा होणे.

adyerse reaction-Any response to a drug that is noxious and unintended and that occurs at doses used in man for prophylaxis diagnosis or therapy.

प्रतिकूल प्रतिक्रिया-पूर्वप्रतिरक्षा, निदान किंवा उपचार यांसाठी माणसांना दिलेल्या औषधाचा अपायकारक किंवा अहेतूक असा कोणताही प्रतिसाद.

additive properties-Physical properties dependent on the number and kind of atoms in a molecule; they can be calculated from a few fundamental constants describing similar properties of atoms or groups. e. g. molar volume atomic weight.

समावेशी गुणधर्म-रेणूतील अणूंची संख्या व प्रकार यांवर अवलंबून असलेले भौतिक गुणधर्म; अणूंच्या किंवा गटांच्या तशाच गुणधर्मांच्या काही मूळ स्थिरांकांवरून ते काढता येतात. उदा. ग्रॅमरेणु आकारमान, अणुभार.

Alcoholies’ Anonymous-A well-known self-help organisation for both “non-practicing” and “practicing” alcholics that has the primary goal of perpetual sobriety for its members.

अल्कोहोलिक्स अॅनानिमस-“मद्य सोडलेले” आणि “मद्य घेणारे” यांसाठी ही सुप्रसिद्ध आत्मसहाय्य संघटना असून आपल्या सदस्यांना मद्यापासून कायमची मुक्ती मिळावी, हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.

alcoholism-Behavioural disorder manifested by excessive consumption of alcoholic beverages to an extent that interferes with the patient’s health economic functioning; some degree of habituation, dependence or addiction is implied.

मदात्यय, मद्यातिरेक-रुग्णाच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होईल अशा अतिरिक्त प्रमाणात अल्कोहोलयुक्त पेयांच्या सेवनामुळे निर्माण झालेला वर्तनातील बिघाड; याद्वारे मद्यासक्ती, काही प्रमाणात सवय लागणे, अवलंबून असणे किंवा आसक्ती सूचित होते.

aerosol-Colloid system in which solid or liquid particles are suspended in air or gas specially a suspension of a drug to be dispensed in a fine spray or mist.

एरोसॉल, सूक्ष्मफवारा, सूक्ष्मतुषार-स्थायूचे किंवा द्रायूचे कण हवेमध्ये किंवा वायूमध्ये निलंबित असलेली, विशेषतः सूक्ष्म फवाऱ्याच्या किंवा तुषारांच्या स्वरूपात वितरित करावयाच्या औषधि-निलंबनाचा समावेश असलेली कलिलपद्धती.

akathisia from antipsychotic drugs-A morbid fear of sitting down or to lie leading to restlessness.

मनोदुर्दशारोधी औषधांमुळे होणारा ॲकाथिशिआ-अस्वस्थतेत परिणती होणारी, बसून रहाण्याचे किंवा आडवे होण्याचे भय वाटण्याची विकृत अवस्था.

alligation-It is a type of calculation involving mixing of two similar preparations but of different strength to produce a preparation of intermediate strength.

प्रमिश्रण-मध्यम क्षमतेचा सिद्ध पदार्थ तयार करण्यासाठी निरनिराळया क्षमतेचे परंतु दोन सारख्या सिद्ध पदार्थाचे मिश्रण करण्यासाठी ठरवलेली आकडेमोडीची पद्धत.

antimetabolite-A substance bearing a close structural resemblance to one required for normal physiological functioning and exerting its effect by interfering with the utilisation of the essential metabolite.

प्रतिचयापचयक-सर्वसाधारण शरीरक्रिया घडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या पदार्थाशी खूपच संरचनात्मक साम्य असलेला आणि आवश्यक चयापचयकांच्या वापरामध्ये हस्तक्षेप करून आपला प्रभाव पाडणारा पदार्थ.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)