आद्याक्षर सूची (1063)

Twist

१ पीळ देणे २ विपर्यास करणे ३ ओढाताण करणे ४ मुरगळणे, पिळवटणे, n.१ विपर्यास (पु.) २ ओढाताण (स्त्री.)

Tender

१ (to make an offer to carry out work supply goods etc. at a stated price) निविदा देणे २ Law (to offer for acceptance esp. to offer in payment) देवू करणे, निविदान करणे ३ (to offer to present as a resignation) देणे, n. १ निविदा (स्त्री.) २ Law देऊ करणे (न.), निविदान (न.) ३ Naut.(a small vessel attending on a larger one) पुरवठ्याचे जहाज (न.) ४ Rly. इंजिनाचा) कोळशाचा व पाण्याचा डबा (पु.), adj. कोमल, नाजूक, कोवळा

Trifle

क्षुल्लक गोष्ट (स्त्री.), v.t.& i स १ (with with)खेळ करणे २ (विथ अवय)क्षुल्लक गोष्टीत वेळ घालवणे, माशा मारणे, उधळणे

Thin

१ पातळ २ विरळ ३ बारीक, कृश ४ तुरळक, v.t.& i. १ पातळ करणे, पातळ होणे २ विरळ करणे, विरळ होणे ३ कृश होणे

Tone

१ स्वर (पु.) २ प्रवृत्ति (स्त्री.) ३ (harmoney of the colours of a painting) रंगमेळ (पु.), रंगमिलाफ (पु.), रंगसंवाद (पु.) ४ (tint or shade of colour) रंगछटा (स्त्री.) ५ (Photog. colour of finished positive picture)रंगउठाव (पु.), रंगखुलावट (स्त्री.), v.t.& i. १ स्वर लावणे २ छटा देणे ३ Photog. रंग खुलवणे ४ रंगसंगती जुळणे, रंगसंगती होणे

Transfer

१ स्थानांतरण (न.), बदली (स्त्री.) २ Law हस्तांतरण (न.) ३ Acctt(as, of entry)लेखांतरण (न.), खातेबदल (पु.), v.t. १ स्थानांतरण करणे, बदली करणे २ Law हस्तांतरण करणे, नावावर करुन देणे cf.Alienate

Top

१ टोक (न.) २ माथा (पु.) ३ भोवरा (पु.), v.t. १ सर्वप्रथम येणे, सर्वप्रथम असणे २ (to remove top of a plant to improve growth)शेंडे खुडणे, adj..उत्तम

Touch

१ स्पर्श (पु.) २ छटा (स्त्री.) ३ मागमूस (पु.), लवलेश (पु.), v.t.& i १ स्पर्श करणे २ (to come into contact)स्पर्श होण ३ उल्लेख करणे

Transport

परिवहन (न.), वाहतूक (स्त्री.), v.t. १ परिवहन करणे, वाहतूक करणे २ काळ्या पाण्यावर पाठवणे cf.Banish

Testify

१ Law (to give testimony according to the law of legal procedure)साक्ष देणे २ Law (to affirm or declere solemnly)प्रमाणित करणे ३ (to be evidence of) -वरुन दिसून येणे

Type

टंकलिखित करणे, n.१ print.मुद्राक्षर (न.), मुद्र (पु.), टंक २ (as, an illustration)उदाहरण (न.) ३ (as, a specimen or model)नमुना (पु.) ४ (general character of a class or group) जात ५ (pattern) प्रकार (पु.)

Tip

१ कलंडवणे, कलंडणे, उपडे करणे २ (to make incline or slant) कलते करणे ३ Sports (to give secret information about a horse)गुप्‍त सूचना देणे ४ चिरीमिरी देणे, बक्षिसी देणे n.१ गुप्‍त सूचना (स्त्री.) २ चिरीमिरी (स्त्री.), बक्षिसी (स्त्री.) ३ टोक (न.)

Tilage

१ (the operation practice or art of tilling land) शेतकसणी (स्त्री.), कास्तकारी (स्त्री.) cf. Agriculture २ मशागत (स्त्री.) ३ वहितीची जमीन (स्त्री.)

Trace

१ गिरवणे, अनुरेखन करणे २ शोधून काढणे, माग काढणे n. १ (the line of footprints left by an animal, etc) माग (पु.) २ मागमूस (पु.) ३ (a very small amount)अल्पांश (पु.), लेश (पु.) ४ ( a mark, sign, etc)खूण (स्त्री.) ५ (a footprint)पावलाचा ठसा (पु.)

Trunk

१ (of tree)बुंधा (पु.), खोड (न.) २ कबंध (पु.) ३ (box(पेटी (स्त्री.), ट्रंक (स्त्री.) ४ प्रमुख तारमार्ग (पु.) ५ प्रमुख रूळमार्ग (पु.) 6 प्रमुख मार्ग (पु.) 7 (of an elephant)सोंड

Tenancy

१ Law (a temporary occupation or holding of land by a tenant) कुळवहिवाट (स्त्री.) २ (in case of property other than lands) भाडेदारी (स्त्री.) ३ कुळवहिवाटीची मुदत (स्त्री.), भाडेदारीची मुदत (स्त्री.)

Tenure

१ पदावधि (पु.), पदाधिकार (पु.) २ नियत अवधि (पु.), अवधि (पु.) ३ Law धारणा (स्त्री.), अधिकार (पु.) ४ Law भूधॄति (स्त्री.) ५ Law (the manner or system whereby lands are held) भूधारणापद्धती (स्त्री.)

Test

१ पारख करणे, कसोटी लावून पाहणे २ कस लावून पाहणे ३ चाचणी घेणे, n.१ चाचणी (स्त्री.), परीक्षा (स्त्री.) २ कसोटी (स्त्री.) ३ (the extrenal shell)कवच (न.) ४ (a test-match)कसोटी सामना (पु.)

Trust

१ विश्वास (पु.), भरवसा (पु.) २ Law न्यास (पु.) ३ (as, improvement trust, part trust, etc)विश्वस्तमंडळ n. v.t.& i. विश्वास ठेवणे, भरवसा बाळगणे

Tap

१ थापटी मारणे २ ठोठावणे, ठोकणे ३ (रस, चीक वगैरे काढण्यासाठी झाडांना)खाप पाडणे ४ अंदाज ५ (as conversation, messages, etc.) चोरुन ऐकणे ६ Chem.& Phys.वाट फोडणे, शाखा काढणे, n. १ तोटी (स्त्री.) २ थापटी (स्त्री.) ३ टिचकी (स्त्री.)

Tenant

१ (one who pays rent for any holding) भाडेकरी (सा.), भाडेकरू (सा.), खंडकरी (सा.) २ (as a tenant farmer) किसान (पु.) ३ Law (one who holds land under another) कूळ (न.), v.t.& i. १ (to hold as a tenant ; to occupy) वहिवाट करणे २ (to dwell) (भाड्याने) रहाणे

Tape

१ फीत (स्त्री.), पट्टी (स्त्री.) २ नाडी (स्त्री.) ३ नवार (स्त्री.), v.t. १ फीत लावणे २ नवार लावणे

Tie

१ बांधणे, बांधून ठेवणे २ बंधन घालणे, n.१ बंध (पु.) २ (as, equal score in a game etc, ) समबंध (पु.) ३ गाठ (स्त्री.)

Tin

१ कथील (न.) २ (कथलाचा पत्र्याचा) डबा (पु.), v.t. १ कल्हई लावणे, कल्हई करणे २ डबाबंद करणे, डब्यात भरणे, adj. कथालाचा

Tan

१ (to turn hides into leather) (कच्ची कातडी) कमावणे २ (to make skin, etc.brown by exposure to the sun)(उन्हाने)काळवंडणे, n.कातडी कमावण्याची साल (स्त्री.)

Taste

१ चव (स्त्री.), स्वाद (पु.) २ अभिरुचि (स्त्री.), v.t.& i. चव घेणे, स्वाद धेणे, स्वाद पाहणे