persistent state

(also recurrent state) पुनरावर्ती स्थित [मार्कोव्ह मालिकेतील स्थिती जर निश्चितपणे पुन्हा प्राप्त होत असेल तर त्या स्थितीस 'पुनरावर्ती स्थिती' असे म्हणतात. पुनरावर्ती स्थितीचे दोन प्रकार : १ प्रदीर्घावर्ती स्थिती (null recurrent state = null persistent state = null state) २ सत्वरावर्ती स्थिती (non-null persistent state = non - null recurrent state = positive recurrent state). ज्या पुनरावर्ती स्थितीचा पुनरावर्तन कालमध्य सांत असतो त्या स्थितीला 'सत्वरावर्ती स्थिती' म्हणतात व ज्या पुनरावर्ती स्थितीचा पुनरावर्तन कालमध्य अनंत असतो त्या स्थितीला 'प्रदीर्घवर्ती स्थिती' म्हणतात.]