branching Poisson process

शाखन प्वॉसाँ प्रक्रम [प्वॉसाँ समूहन प्रक्रम (Poisson clustering process) या संज्ञेऐवजी वरील संज्ञा Lewis (१९६४) ने सुचवली. ज्या मूळ प्वॉसाँ प्रक्रमात प्रत्येक घटनेनंतर व मुख्य प्वॉसाँ प्रक्रमातील घटनेपूर्वी सहयोगी (associated) घटनांची क्रमिका (sequence) येते त्याला 'शाखन प्वॉसाँ प्रक्रम' म्हणतात. यातील सहयोगी घटनांची क्रमिका हा स्वतःच प्वॉसाँ नसू शकणारा (not necessarily) एक दुय्यम (subsidiary) प्रक्रम असतो. संमिश्र (complex) प्वॉसाँ प्रक्रमाचा अंतर्भाव करण्याकरिता बार्टलेटने (१९६३) ही संज्ञा सुचवली आहे.]