आद्याक्षर सूची (538)

sampling unit

नमुनानिवड एकक [नमुनानिवड करण्यासाठी एखाद्या समुच्चयाचे ज्या एककांत विभाजन करतात किंवा विभाजन केले आहे असे समजतात त्यांपैकी एक. निवड करताना प्रत्येक एकक हा स्वतंत्र आणि अविभाज्य आहे असे धरतात. एककाच्या व्याख्येचा आधार नैसर्गिक असेल, जसे परिवार, माणसे, उत्पादित वस्तू, तिकिटे, इत्यादी किंवा स्वेच्छ असेल, जसे नकाशात जाळी निर्देशांकांनी निश्चित केलेले क्षेत्र. बहुटप्पी नमुनानिवडीत वेगवेगळ्या टप्प्यांतले एकक वेगवेगळे असतात. पहिल्या टप्प्यात ते 'मोठे' असतात आणि निवडीच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याबरोबर अधिकाधिक लहान होत जातात. नमुना एकक ही संज्ञा याच अर्थाने कधीकधी वापरतात.]

self-avoiding random walk

स्वयंवर्जी यादृच्छिक भ्रमण [एका घटकाचा जालकावरील यादृच्छिक भ्रमणमार्ग त्या मार्गाला कोणत्याही बिंदूत छेदत नसेल वा स्पर्श करत नसेल तर तो भ्रमणमार्ग भौतिक आकारमान असलेल्या दोन घटकांच्या अवकाशातील भ्रमणमार्गासारखा असतो कारण ते घटक एकाच वेळी अवकाशाचा एकच भाग व्यापू शकत नाहीत.]

singly linked block design

एकबद्ध खंड संकल्पन [युडेन (१९५१) यांनी सुचवलेला अपूर्ण खंड संकल्पनांचा एक वर्ग. यात खंडांच्या प्रत्येक जोडीत एक उपचार समाईक असतो. उदा. - प्रत्येकी चार खंडकांच्या पाच खंडात दहा उपचारांचे संकल्पन खालीलप्रमाणे आहे : १ १ २ ३ ४ २ ५ ५ ६ ७ ३ ६ ८ ८ ९ ४ ७ ९ १० १० त्रिकोणी संकल्पनाचे हे एक विशिष्ट उदाहरण आहे.]

serial cluster

यथाक्रम समूह [नेहमीप्रमाणे समूहाची प्रत्यक्ष मर्यादा किंवा समूहातील एककांची यादी न देता आराखड्यातील एककांना अगोदरच दिलेल्या क्रमांकांवर आधारित असलेल्या नियमानुसार हा समूह बनवतात.] (पहा : entry plot)

space homogeneous process

अवकाश एकविध प्रक्रम [एखाद्या यादृच्छिक प्रक्रमात कोणत्याही दोन क्षणी मिळणाऱ्या दोन स्थितींमधील संक्रमणसंभाव्यता जर त्या दोन स्थिति मूल्यांमधील फरकावरच अवलंबून रहात असेल तर त्या प्रक्रमास 'अवकाश एकविध प्रक्रम' असे म्हणतात. हेच खालील सूत्राने सांगता येईल जर असेल तर त्या प्रक्रमात असते.]

staircase design

सोपान संकल्पन [ग्रेबिल आणि प्रुईट (१९५८) यांनी सुचवलेले संकल्पन. प्रत्येक खंडातली प्रायोगिक एककांची संख्या सारखी नसतानाही मूलभूत यदृच्छित खंड संकल्पन लागू करतात.]

serial correlation cf. lag correlation

पश्चता सहसंबंध [कालक्रमिकेमधी (time series) किंवा अवकाशक्रमिकेमधील (space series) घटकांतील (members) सहसंबंध. कालक्रमिकेतील किंवा अवकाशक्रमिकेतील एकाच दिशेतील कालांतर किंवा अवकाशांतर समान असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर U1, U2, U3,… हे क्रमिकेतील घटक असतील तर (U1, U4), (U2, U5), (U3, U6),..... या जोड्यांमधील सहसंबंधाला तिसऱ्या कोटिकेचा (order) 'अनुक्रम सहसंबंध' असे म्हणतात.

statistic

n. (also sample statistic) नमुनाफल (न.) [नमुना मूल्यांचे एखादे फल. उदा. मूल्यांचा मध्य, मूल्यांचे विचरण, मूल्यांचे परिबल, इ. हे फल बहुधा एखाद्या समष्टि प्राचलाचा आकलक म्हणून किंवा प्राचलाच्या कसोटीसाठी वापरण्यात येते.]

screening inspection cf. sampling inspection

[सामग्रीच्या किंवा उत्पाद एककांच्या गटाचे संपूर्ण परीक्षण आणि सर्व सदोष वस्तूंचे त्यजन, याला 'सकल परीक्षण' किंवा '१०० टक्के परीक्षण' अशी दुसरी नावे आहेत.] (शिवाय पहा : sampling inspection)

shot noise

आकस्मिक कुरव [ही संज्ञा यादृच्छिक विक्षोभ श्रेणीकरिता वापरली जाते. संदेशन सिद्धांतात χ हा संकेत पाठवला अशता विक्षोभामुळे y हा संकेत ग्रहण केला जातो. y चे संभाव्यता वितरण χ वर अवलंबून असते. हे विक्षोभ यादृच्छिक कालावधीनंतर उद्‌भवत असतील तर त्यास 'आकस्मिक कुरव' असे म्हणतात.]

symmetry

n. सममिति (स्त्री.) [वारंवारता वक्राच्या संदर्भातील संज्ञा. जर एखाद्या a या विवक्षित मूल्यापासून समदूर असलेल्या मूल्यांच्या वारंवारता समान असतील तर तो वक्र सममित असतो. वक्राच्या या गुणधर्मास 'सममिती' म्हणतात. गणितीय भाषेत म्हणायचे झाल्यास जर f (a-x) = f(a+x) हे सगळ्या χ साठी साध्य होत असेल तर f(.) हा वक्र a- सममित आहे असे म्हणतात. उदा. प्रमाणित प्रसामान्य घनता फल हे शून्यसममित आहे.]

serial design cf. overlap design

परस्परव्यापी संकल्पन [कालातील परस्परव्यापी परिणामांचा दोन कारणांसाठी उपयोग करणारे हे प्रायोगिक संकल्पन (experimental design) आहे. ही दोन कारणे म्हणजे (१) परिमाणांचे आकल (estimates) काढणे, आणि (२) अधिक काळपर्यंत प्रयोग चालू ठेवण्याकरिता एक आधार मिळवणे ही होत.] (शिवाय पहा : evolutionary operation)

simple sample

सोपा नमुना [ओढतीतील सर्व घटकांच्या निवडसंभाव्यता जेव्हा समान अतात आणि शेवटच्या ओढीपर्यंत स्थिर असतात तेव्हा अशा नमुन्याला 'सोपा नमुना' म्हणतात.]

survey

n. सर्वेक्षण (न.) cf. enquiry [एककांच्या समुच्चयाची तपासणी. बहुधा हे एकक म्हणजे व्यक्ती किंवा आर्थिक वा सामाजिक संस्था इ. असतात. काटेकोरपणे पाहता सर्वेक्षण म्हणजे विचाराधीन संपूर्ण समष्टीची तपशीलवार जाऊन केलेली तपासणी, पण बऱ्याच वेळा नमुना सर्वेक्षणालाही म्हणतात. ]

sample point cf. sample space

नमुना अवकाश [χ1, χ2, ....,χn हा n यादृच्छिक चलमूल्यांचा नमुना n- मितीय (बहुश:युक्लीडीय) अवकाशातला बिंदू किंवा सदिश म्हणून दाखवता येतो. असे करताना ही चल-मूल्ये निर्देशक असतात. निरीक्षण केलेल्या नमुना मूल्यांच्या संचाशी संगत असा या अवकाशातला बिंदू म्हणजे नमुना बिंदू.]

Scheffe's test

शेफे कसोटी [प्रचरण विश्लेषणात उद्‌भवणाऱ्या मध्य मूल्यांच्या एका किंवा अनेक तुलनांच्या लक्षणीयतेची कसोटी पहाण्यासाठी असलेली संरक्षी पद्धती. मध्य मूल्यांच्या एका जोडीसाठी ही कसोटी t कसोटीशी समरूप असते. म्हणजेच ही कसोटी t कसोटीचे विस्तारीकरण होय.]

Sack's theorem

सॅक प्रमेय [सॅक (१९५८) यांच्या या प्रमेयात अत्यंत सर्वसाधारण शर्ती असताना असे म्हटले आहे की, जेव्हा an=c/n(c स्थिर) या अचलांबरोबर प्रसंभाव्य समीपन विषयक रॉबिन्स-मन्रो प्रक्रम वापरतात तेव्हा (χn-ϳ) चे वितरण अनंतवर्ती शून्य - मध्य - प्रसामान्य वितरण होते. या प्रमेयामुळे व्होरेट्स्की प्रमेयाच्या समवेत अधिक व्यापक शर्ती असताना रॉबिन्स - मन्रो प्रक्रम वापरण्यास तात्त्विक आधार मिळतो.]

sample size

नमुना संख्या [नमुन्यात समाविष्ट करावयाच्या नमुनानिवड एककांची संख्या. बहुटप्पी नमुना निवडीमध्ये नमुना संख्या म्हणजे शेवटच्या टप्प्यातील एकूण एककांची संख्या होय.]

sampling on successive occasions

लागोपाठ नमुनानिवड [नमुनानिवड एकदाच न करता लागोपाठच्या प्रसंगी करण्याचा प्रकार. नमुना सर्वेक्षणात यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. उदाहरणार्थ : प्रत्येक प्रसंगी नवा नमुना निवडतात किंवा नमुन्याचे अंशतः पुनःस्थान करतात किंवा आरंभाच्या नमुन्यातून उपनमुना निवडतात.]

semi-invariant

n. (also half-invariant or called cumuiant) अर्ध अविकारी (पु.) [जी नमुनाफले आदिबिंदु-अधीन नसतात आणि प्रमाण-रूपांतरणात ज्यांना प्रमाण गुणकाने गुणावे लागते अशांसाठी हा शब्द वापरतात. उदा. नमुना-मध्य सापेक्ष परिबले व संचयके.]

sigmoid curve

अवग्रहाभ वक्र [हा वक्र दोन आडव्या अनंतोपगांमध्ये पसरलेला असतो. त्याने दर्शविलेले फल एकस्वनिकतेने वाढते आणि त्याचा नतिपरिवर्तन-बिंदू अंतोपगांच्या साधारण मध्यावर असतो, म्हणून तो थोडासा अवग्रहा (s) सारखा दिसतो. संख्याशास्त्रात हा वक्र इतर गोष्टींबरोबर एकबहुलकी वितरणांची वितरण-फले, पर्ल-रीड वृद्धि वक्रासारखे वृद्धि वक्र आणि जीवशास्त्रीय आमापनातला एक विशिष्ट मात्रा प्रतिसाद-संबंध यांच्या संदर्भात आढळतो.]

snowball sampling

हिमगोल नमुनानिवड [गुडमन(१९६१) यांनी सुचवलेली नमुनानिवडीचा एक प्रकार. सांत समष्टीतून n व्यक्तींचा एक यादृच्छिक नमुना काढतात. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडून नमुन्यात घेण्यासाठी आणखी k व्यक्तींची नावे मागितली जातात. हा पहिला टप्पा. अशा प्रकारे s टप्प्पयापर्यंत जातात. प्रारंभिक नमुना उकल आणि त्या नमुन्याचे आकारमान यांवरून आधारसामग्रीचे विश्लषण कसे करावे आणि त्यातून निघणारी अनुमाने कोणती हे ठरते.]

sample space

नमुना अवकाश cf . Sample point [१ एखाद्या प्रयोगातून निघू शकणाऱ्या सर्व निष्पत्तींचा संच. २ एखाद्या प्रयोगाच्या सर्व निष्पत्तींशी संगत असलेल्या बिंदूंची संच. या बिंदूंनाच नमुना बिंदू असे म्हणतात.]

simplex centroid design

सरलाकृति प्रकेंद्र संकल्पन [शेफे (१९६३) यांनी सुचवलेले मिश्रणे वापरणारे प्रयोग संकल्पन. जर अंगभूत भाग m असले आणि सर्व मिश्रणे सम प्रमाणांची असली तर संकल्पनांत अंतभूत असलेली निरीक्षणे 1 पासून m पर्यंत अंगभूत भाग वापरून मिळणाऱ्या मिश्रणांच्या सर्व उपसंचांवरील असतात.]

selection with arbitrary (variable) probability

स्वेच्छ संभाव्यता (बदलत्या) निवड [नमुनानिवडीच्या या कार्यपद्धतीत निवडीपूर्वीच समष्टीतील एकके निवडण्याच्या संभाव्यता सहेतुक पण स्वेचछेने ठरविलेल्या असतात. नेहमीप्रमाणे नमुनाएकक एकामागून एक निवडले तर प्रत्येक निवडीच्या वेळचा संभाव्यता संच वेगळा असू शकतो.] (शिवाय पहा : selection with equal probability)

spectral weight function

मानपंक्तीय भार फल [मानपंक्तीय घनतेच्या आकलनासाठी वापरलेले भार फल. हे फल कधीकधी मानपंक्तीय गवाक्ष म्हणून ओळखले जाते. या फलासाठी डॅनिएल (१९४६), यार्टलेट (१९४८), ब्लॅकमन व टकी (१९५९) आणि पार्झेन (१९६१), इत्यादींनी वेगवेगळे विनिर्देश सुचविले आहेत.]

sample survey

नमुना सर्वेक्षण, नमुना पाहणी [नमुनानिवड पद्धत वापरून केलेली पाहणी म्हणजे या पाहणीत संपूर्ण समष्टीची पाहणी न करता तिच्या एका भागाचीच पाहणी करतात.]

selection with equal probability

समान संभाव्यता निवड [सर्व एककांच्या निवड-संभाव्यता समान राहतील अशाप्रकारे एकक-संचातून केलेली एका एककाची निवड, हा याचा मूलभूत अर्थ आहे. पण जेव्हा नमुन्यात एकापेक्षा अधिक एकके असतात तेव्हा या संज्ञेच्या वापरात एकसमानता नसते.

sample unit

नमुना एकक [ही संज्ञा पुष्कळ वेळा नमुनानिवड एककाशी समानार्थक असते. पण विशिष्ट नमुन्यातील एखाद्या घटकाचा निर्देश करण्याकरिता तिचा उपयोग करणे अधिक चांगले.]

seasonal variation

मोसमी विचरण [वर्षभरात मोसमी परिणामामुळे कालक्रमिकेत होणाऱ्या हालचाली. उदाहरणार्थ, पर्जन्यमानातील मोसमी विचरण. नियतकालिक बाह्य कारणांमुळे जेव्हा चढउतार होतात तेव्हादेखील ही संज्ञा वापरतात. उदाहरणार्थ, तापमानातील दैनिक विचरणांचे वर्णन 'मोसमी' असे करता येईल.]

selection with probability proportional to size

आकारानुसारी संभाव्यता निवड [एककाच्या आकाराच्या प्रमाणात प्रत्येक एककाची निवडसंभाव्यता असते. परंतु परत ठेवून नमुनानिवड (sampling with replacement) असेल तरच एकामागून एक निवडलेल्या एककांची संभाव्यता ही आकाराच्या प्रमाणात राहील याची खात्री देता येईल; अन्यथा नाही.]

series queues cf. tandem queues

अनुवर्ती रांगा [या पद्धतीत रांग पद्धतीचा भाग असणाऱ्या 1, 2, .........k, या सुविधा प्रत्येक आगमन एककाला एकामागून एक या क्रमाने मिळतात. 'अनुवर्ती रांगा' या संज्ञेने थोडीशी वेगळी संकल्पना व्यक्त होते]

single sampling cf. double sampling

दुबार नमुनानिवड [नमुनानिवड परीक्षणाच्या या प्रकारात संबंधित माल एखाद्या विनिर्देशाशी जुळतो या परिकल्पनेचा स्वीकार किंवा त्यजन करण्याचा निर्णय एकाच नमुन्याच्या परीक्षणानंतर घेतात.]

s-test

n. s-कसोटी (स्त्री.) [निरीक्षणातून उपलब्ध होणारे प्रमाण विचलन लक्षणीय आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हेल्मर्ट वितरण वापरणारी कसोटी या सकोटीला 's-कसोटी' असे म्हणतात. ही कसोटी कायवर्ग कसोटीशी समतुल्य असल्यामुळे या वेगळ्या नावाची आवश्यकता वाटत नाही.]

stochastic convergence

प्रसंभाव्य अभिसरण [संभाव्यता सिद्धांतातील अभिसरणाच्या अनेक संकल्पनांपैकी एक. यादृच्छिक चलांच्या {χn} या क्रमिकेत जर (प्रत्येक Ν>ο साठी) असेल तर ती क्रमिका यादृच्छिक चल X कडे प्रसंभाव्यतः अभिसरते असे म्हणतात. यालाच प्रसंभाव्यता अभिसरण (convergence in probability) आणि मान अभिसरण (convergence in measure) असे म्हणतात.]

sampling structure

नमुनानिवड संरचना [संपूर्णपणे विनिर्दिष्ट अशा नमुना किंवा सर्वेक्षण प्रकल्पाच्या वर्गाची व्याख्या करणारे विनिर्देशन. इष्टतम प्रकल्पाच्या समस्यांच्या बाबतीत इष्टतमीकरण हे सर्व कल्पनीय शक्यतांचा विचार न करता दिलेल्या वर्गातल्या प्रकल्पापुरतेच मर्यादित असते.]

shock and error model

धक्का आणि दोष प्रतिमान [या समीकरण प्रणालीत विशिष्ट चलांशी संबंधित असे यादृच्छिक घटक (चलदोष) आणि प्रणालीतील विशिष्ट समीकरणांशी संबंधित असे यादृच्छिक घटक, म्हणजेच धक्के, (समीकरण दोष) असतात.]

second limit theorem

दुसरे सीमा प्रमेय [स्थूलमानाने या प्रमेयात असे म्हटले आहे की, {Fn} या वितरण फल क्रमिकेची परिबले जर F या वितरण फलाच्या परिबलांकडे अभिसारित होत असतील, शिवाय {Fn} आणि F च्या सर्व कोटिकांची परिबले अस्तित्वात असतील आणि हे वितरण फल त्याच्या परिबलांनी एकमेकतः निश्चित होत असेल तर {Fn} ही फलक्रमिका F या फलाकडे अभिसारित होते.] (शिवाय पहा : firs limit theorem)

self - weighting sample

स्वयंभारी नमुना [जर सर्व नमुना एककांचे वर्धक गुणक समान असले तर विचाराधीन असलेल्या विशिष्ट रेषीय आकलकासाठी तो नमुना स्वयंभारी असतो. पण अन्य आकलकासाठी तो स्वयंभारी नसू शकतो. साधारणतः नमुना प्रकल्पात स्वयंभारी नमन्याचा अंतर्भाव करतात. हे स्वयंभारित्व बहुशः संपूर्ण समष्टीच्या बेरजेसाठी असते. त्यामुळे कोष्टकीकरणाचे काम सोपे होते. कारण नमुन्याच्या बेरजेवरून समष्टीच्या बेरजेचे आकलन सहजतेने होते. द्विटप्पी (बहुटप्पी) नमुनानिवडीत दुसऱ्या टप्प्याच्या नमुना एककांची संख्या किंवा त्यांचे प्रमाण नमुना स्वयंभारी व्हावा अशा प्रकारे निश्चित करतात.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)