selection with equal probability

समान संभाव्यता निवड [सर्व एककांच्या निवड-संभाव्यता समान राहतील अशाप्रकारे एकक-संचातून केलेली एका एककाची निवड, हा याचा मूलभूत अर्थ आहे. पण जेव्हा नमुन्यात एकापेक्षा अधिक एकके असतात तेव्हा या संज्ञेच्या वापरात एकसमानता नसते. तिचा संबंध कोणत्याही एका एककाच्या, व्यक्तिशः आणि / किंवा सामूहिक रीतीने केलेल्या निवडीच्या दोन किंवा अधिक कृतींशी असतो किंवा अशा सर्व कृतींनी मिळणाऱ्या संपूर्ण नमुन्याशी असतो; हा संबंध नमुना-एककाशी असेल वा नसेल जसे, स्तरित-साध्या-यादृच्छिक नमुनानिवडीत वेगवेगळ्या स्तरांतले नमुनानिवड अंश वेगवेगळे असल्यास प्रत्येक स्तरातील नमुनानिवडीची कृती मूलतः समसंभाव्यतेची असली तरीही संपूर्ण नमुन्याचा निर्देश, 'असमान संभाव्यतेने निवडलेला नमुना', अशाप्रकारे कधीकधी करतात.]