आद्याक्षर सूची (1275)

Magnitude

१ (extant, dimensions or size) परिणाम (न.) २ ( expansion) विस्तार ३ (greatness, grandeur) थोरवी ४ (quantity) मात्रा (स्त्री.), ५ (importance) महत्ता (स्त्री.)

Maintainance

१ परिरक्षा (स्त्री.), सुस्थितीत ठेवणे (न.), cf.Preservation २ पालन (न.) ३ निर्वाह (पु.), चरितार्थ (पु.) ४ निर्वाह खर्च (पु.) ५ Law पोटगी (स्त्री.)

Mine

१ खाण (स्त्री.), खनि (स्त्री.) २ सुरुंग (पु.), v.t. १ खाण खोदणे २ बोगदा खणणे ३ सुरुंग लावणे, possessive adj. माझा

Model

१ आदर्श (पु.) २ प्रतिमान (न.), v.t. नमुन्याप्रमाणे) तयार करणे, adj. १ आदर्श २ नमुन्याचा ३ नमुनेदार

Motion

१ प्रस्ताव (पु.) २ गति (स्त्री.) ३ Law (an application by party for rule or order of the court) समावेदन (न.) ४ रेच (पु.), v.t. खुणेने सांगणे

Mould

१ साचा (पु.) २ (a woolly or fluffy growth on bread, cheese, etc.) बुरशी (स्त्री.) ३ मऊ सकस माती (स्त्री.), v.t.& i. १ आकार देणे, साच्यात घालून बनवणे २ बुरसवणे ३ बुरसटणे

Majority

१ Law सज्ञानवयता (स्त्री.) २ बहुमत (न.) ३ बहुसंख्या (स्त्री.) ४ आधिक्य (न.) ५ बहुसंख्याक लोक (पु.अ.व.), adj. बहुसंख्य, बहुसंख्याक

Match

१ (to be equal to) तोडीचा असणे, तोलाचा असणे २ (to equal ; to be able to compete with) बरोबरी करणे, पुरा पडणे ३ (to find an equal or counterpart to) जोड देणे ४ (to tream as equal) बरोबरीचा ठरवणे ५ (to correspond ; to fit in with ; to suit) जुळता असणे, n. १ सामना (पु.) २ जोड (स्त्री.) ३ आगकाडी (स्त्री.)

Matter

१ प्रयोजन असणे २ महत्वाचा असणे, n. १ बाब (स्त्री.) २ प्रकरण (न.) ३ पदार्थ (पु.) ४ विषय (पु.), गोष्ट (स्त्री.) ५ मजकूर (पु.) ६ जडवस्तु (स्त्री.), जडतत्व (न.) ७ Phys.द्रव्य (न.)

Mistress

१ (the female head of the family) गृहस्वामिनी (स्त्री.) २ (a woman teacher) अध्यापिका (स्त्री.) ३ (a concubine) रखेली (स्त्री.) ४ Admin. श्रीमती (स्त्री.)

Marshal

मार्शल (पु.), v.t. १ Com. & Law (to arrange or fix the order of creditors with reference to their priority) क्रमरचना करणे २ क्रमरचना मांडणी करणे cf. Organise

Minute

१ (१/60th part of an hour) मिनिट (न.) २ (note) टिप्पणी (स्त्री.) ३ (of a minister) अभिटिप्पणी (स्त्री.) ४ (in pl.a brief summary of the proceedings of a meeting) कार्यवृत्त (न.), adj. सूक्ष्म

Mobilise

१ (to assemble and put in a state of readiness for service in war) सैन्यसज्ज करणे २ सुसज्ज करणे ३ (as resources etc.) संघटित करुन कामी लावणे ४ (as, opinion, etc.) चालना देणे, जागृत करणे

Minor

(one who has not attained full legal age) अज्ञान (सा.), adj. १ लघु, लहान २ गौण ३ किरकोळ ४ (not having attained the age of majority)अज्ञान

Monster

१ राक्षस (पु.) २ (an animal or plant departing greatly in form or structure from the usual tyep) घोररुप (न.), भयंकर विरुप प्राणी (पु.), भयंकर विरुप वनस्पति (स्त्री.)

Mortar

१ उखळ (न.), खल (पु.) २ (a cement of lime, sand and water)कमावलेला चुना (पु.) ३ (a piece of ordnance for throwing shells, bombs, etc.) उखळी तोफ (स्त्री.), v.t. चुन्याचा गिलावा करणे

Master

१ (a teacher) अध्यापक (पु.) २ निदेशक (पु.) ३ मालक (पु.) ४ नौकाधिपति (पु.) ५मास्तर (पु.), v.t. १ (to become the master of) मालक होणे २ (to overcome to overpower) मात करणे ३ (to become skilful in to gain the command of) प्रभुत्व मिळवणे, हातखंडा असणे, adj. १ प्रवीण २ बृहत ३ श्रेष्ठ

Mighty

१ (having great power) बलाढ्य २ (extraordinatory, wonderful) अचाट ३ (valient) प्रतापी, ऊर्जस्वल, ओजस्वी ४ (as, size) प्रचंड

Mission

१ (body of persons sent to foreign country to conduct negotiations etc.) मंडळ (न.) २ (errand of political or other mission) दौत्य (न.) ३ (person's vocation or divinely appointed work in life) उद्देश्य (न.)

Machine

यंत्र (न.), v.t. १ (to subject to the action of machinery)यंत्रात घालणे, साच्यात घालणे २ (काम, शिवण, मुद्रण वगैरे) यंत्रसाहाय्याने करणे

Magazine

१ शस्त्रागार (न.) २ दारुकोठार (न.) ३ मासपत्रिका (स्त्री.) cf. Periodical v.t. (to store in a magazine) कोठरात ठेवणे

Mark

१ चिन्ह लावणे, खूण करणे२ लक्ष देणे, लक्षात ठेवणे ३ गुण देणे, n. १ चिन्ह (न.), खूण (स्त्री.) २ गुण (पु.) ३ लक्षण (न.) ४ अपेक्षित दर्जा (पु.)

Mess

१ भोजन (न.) २ भोजनालय (न.) cf.Restaurant ३ (a muddle, a hotch-potch) विचका (पु.), v.t.& i. १ जेवण देणे, २ जेवण घेणे ३ (with up) विचका करणे

Merit

१ गुणवत्ता (स्त्री.) २ गुण (पु.), v.t. १ (to have a right to claim as reward) -वर हक्क असणे २ (to deserve) -ला पात्र असणे

Move

१ (to cause to change place or posture) हालवणे २ प्रचलित करणे (as in:to move the Supreme Court सर्वोच्च न्यायालयास प्रचालित करणे) ३ (to change the place or habitation) स्थलांतर करणे ४ (as, a bill of legislature, etc.) मांडणे ५ (as, the government) विनंती करणे ६ (to shake to stir)हलणे ७ फिरणे (as in : to move throughout India भारतात फ़िरणे), n. १ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ (step taken to secure an object) पवित्रा (पु.), पाऊल (न.) (to be moved भारावणे, भारावून जाणे)

Mass

१ रास (स्त्री.), पुंज (पु.) २ समूह (पु.) ३ Phys.द्रव्यमान (न.), वस्तुमान (न.), v.t.& i. १ (to form into a mass) गोळा करणे २ (to assemble in masses) जमणे, adj. १ (of pertaining to or characteristic of mass or the masses) सामुदायिक (as in : mass education सामुदायिक शिक्षण) २ प्रचंड

Mate

१ सहायक (सा.) २ (a husband or wife) जोडीदार (सा.) ३ (a person at the head of labour) मुकादम (पु.) ४ Naut.(a deck office in the merchant marine ranking below the captain) उपतांडेल (पु.)