आद्याक्षर सूची (1133)

Fabricate

१ (to construct a whole by uniting different parts, often made else-where) तयार करणे, पूर्वरचना करणे २ Law खोटा तयार करणे (as in:to fabricate evidence खोटा पुरावा तयार करणे)

Fail

१ (to miss to omit) चुकणे २ निष्फळ होणे, अपयश होणे ३ बंद पडणे ४ (as in examination) अनुत्तीर्ण होणे, नापास होणे

Force

१ (as, police-force)बल (न.) २ सेना (स्त्री.) ३ Law प्रभाव (पु.), अंमल (पु.) ४ जोर (पु.), बळ (न.) ५ बळजबरी (स्त्री.), बळजोरी (स्त्री.) cf. Compulsion v.t. १ भाग पाडणे २ बळजबरी करणे

Fuse

१ एकजीव करणे, एकजीव होणे २ वितळणे ३ Chem.एकीकरण करणे, एकीकरण होणे, n. १ Eles.वितळतार (स्त्री.) २ प्रज्वलक (पु.)

Feed

१ (as a child etc.) भरवणे २ ( as cattle etc.) चारणे, चारा घालणे ३ खाऊ घालणे ४ खाणे ५ (graze)चरणे ६ भरणपोषण करणे, n.१ खाद्य (न.) २ चारा (पु.) ३ मात्रा (स्त्री.)

Fire

१ अग्नि (पु.), विस्तव (पु.) २ आग (स्त्री.), v.t. १ गोळी झाडणे २ (to dismiss from employment) नोकरीतून कमी करणे

Failing

१ दुर्बलता (स्त्री.) २ न्यूनता (स्त्री.), adj. दुर्बळ होणारा, दुर्बळ होत जाणारा prep (in default of) नहून, नपेक्षा, नाहीपेक्षा, न झाल्यास, ना केल्यास, च्या अभावी

Feeder

१ Rly. (a branch railroad to a main line) उपमार्ग (पु.) २ (that which feeds) पूरक उपयंत्र (न.) ३ चारणरा (पु.) ४ (a bib) लाळेरे (न.) ५ (a feeding bottle) दुधाची बाटली (स्त्री.)

Filliation

१ (the realationship of a child to a parent) अपत्यत्व (न.) २ Law (act of fixing paternity of an illegitimate child upon some person) पितृत्वनिश्चिति (स्त्री.)

Floatage

१ (power to float) तरण शक्‍ति ( स्‍त्री.) २ (anything that floats) तरणारा पदार्थ (पु.) ३ (the part of a ship above the water line) उपरि अंश (पु.)

Factum

१ (a man's own atc) स्वकृत्य (न.) २ (an event or fact) तथ्य (न.) ३ Testamentary Law (the due execution of a will) (मृत्युपत्राचे) यथोचित निष्पादन (न.)

Fancy

१ ओढ (स्त्री.), छंद (पु.) २ (illusion) साभास (पु.) ३ (caprice whim) लहर (स्त्री.) ४ (judgement or taste in matters of art, dress, etc.) अभिरुचि (स्त्री.) ५ तरल कल्पना (स्त्री.), adj. चित्रविचित्र, v.i.कल्पना करणे

Farm

१ शेत (न.) २ कृषीक्षेत्र (न.) ३ क्षेत्र (न.), (as in:poultry farm कुक्कुट पैदास क्षेत्र) ४ मळा (पु.) ( as in : sugar-crane farm ऊस मळा), v.t.& i. १ शेती करणे २ (to great or receive the revents of for a fixed) मक्‍त्याने घेणे ३ (to rent to or from) खंडाने देणे, खंडाने घेणे

Flow

१ वाहणे २ ओघ वाहणे ३ प्रवाहित होणे, उगम पावणे, n. १ ओघ (पु.) २ प्रवाह (पु.) ३ (the setting in of the ride) भरती (स्त्री.)

Fellow

१ (a member of the governing body of a university) सन्मान्य सदस्य (सा.) २ (one receiving an allowance for certain studies) अधिछात्र (सा.) cf. Tutor ३ (usu. pl.) जोडीदार (सा.) ४ (a man generally) माणूस (पु.)

Fleece

१ कच्ची लोकर (स्त्री.) २ लोकरीचे आच्छादन (न.), v.t. १ (to deprive or shear off a fleece) लोकर कापणे २ लुबाडणे

Flowering

१ फुलणे (न.), विकसणे (न.) २ बहर (पु.) ३ Bot. पुष्पण (न.), फुले येणे (न.), adj. १ विकासशील २ पुष्पीत होणारा

Faculty

१ (physical capability or power) सहजशक्‍ती (स्त्री.), शक्‍ती (स्त्री.) २ (a department of learning) विद्याशाखा (स्त्री.) (as in :faculty of music संगीत विद्याशाखा) ३ (members of a profession) निकाय (पु.)

Fall

१ पडणे, गळणे २ उतरणे, घसरणे, n. १ (downfall degradation) पतन (न.), पात (पु.) २ (waterfall) प्रपात (पु.), धबधबा (पु.) ३ (the time when the leaves fall) पानझड (स्त्री.) ४ (as in price) उतार (पु.)

Figure

१ आकृति (स्त्री.) २ आकडा (पु.) ३ मूर्ति (स्त्री.) ४ Rhet.अलंकार (पु.) ५ शरीराची ठेवण (स्त्री.), बांधा (पु.), v.t.& i. १ चित्रित करणे २ लक्षणीय होणे ३ आकडे टाकणे, आकडे भरणे ४ (to imagine) कल्पना करणे

Fair

जत्रा (स्त्री.), adj. १ उचित, रास्त, ठीक २ (legible distinct) स्वच्छ ३ (cloudless) निरभ्र ४ (free from rain) कोरडा उघाडीचा ५ (as complexion) गोरा ६ ऩ्याय्य निःपक्ष

Feel

१ स्पर्श करणे २ स्पर्शाने जाणणे ३ वाटणे ४ चाचपडणे, n.स्पर्श (पु.), स्पर्शवेदना (स्त्री.)

Feeling

१ मनोवृत्ती (स्त्री.) २ भावना (स्त्री.) ३ जाणीव (स्त्री.), संवेदना (स्त्री.) ४ स्पर्श (पु.)

Face

१ मुख (न.), चेहरा (पु.), दर्शनी (स्त्री.), बाजू (स्त्री.) ३ Geol. (of a quarry) पृष्ठ (न.) ४ (of a crystal)पैलू, v.t.& i. १ ला तोंड देणे २ च्या समोर असणे, च्या बाजूकडे तोंड करुन असणे

Favour

१ अनुग्रह (पु.), कृपा (स्त्री.) २ मर्जी (स्त्री.), v.t. अनुग्रह करणे, कृपा करणे (in favour of १ -च्या बाजूने २ -च्या नावाने ३ -च्या प्रीत्यर्थ )

File

१ Admin.फाईल करणे, दप्‍तर दाखल करणे २ Admin.फायलीत ठेवणे ३ Law (as a suit, application, etc.) दाखल करणे ४ कानशीने घासणे, कानसणे ५ रांगेने जाणे n. १ Admin. फाईल (स्त्री.) २ कानस (स्त्री.) ३ पंक्‍ती (स्त्री.), रांग (स्त्री.)

Fit

१ बसवणे, जोडणे २ योग्य असणे ३ साजेसा असणे, adj. १ योग्य cf. Appropriate २ साजेसा ३ निरोगी ४ घट्ट

Fold

घडी करणे, घडी घालणे, दुमडणे, n. १ घडी (स्त्री.), चुणी (स्त्री.) २ (an enclosure for protecting domestic animals esp. sheep) मेंढकोट (पु.) ३ गोट (पु.), fold suff. गुण, पट(as in : two fold द्विगुण, दुप्पट)

Factor

१ घटक (पु.) २ कारणीभूत गोष्ट (स्त्री.) ३ com.अडत्या (पु.) cf. Representative ४ Math.अवयव (पु.), गुणक (पु.), गुणनखंड (पु.)

Fitness

१ स्वास्थ्य (न.) २ योग्यता (स्त्री.), cf. Ability ३ पात्रता (स्त्री.) (as in : physical fitness शारीरिक पात्रता)

<