आद्याक्षर सूची (235)

error band

दोष पट्टा [आकलित किंवा अंदाजित मूल्यांच्या कक्षा विश्वास अंतराल किंवा तत्सम पद्धतीने ठरवतात. ही मूल्ये ज्या क्षेत्रात असतात त्या क्षेत्रास 'दोष पट्टा' म्हणतात.]

efficiency

n. कार्यक्षमता (स्त्री.) [वितरणाच्या प्राचलचा एक आकलक दुसऱ्या आकलकापेक्षा अधिक कार्यक्षम असू शकतो. ही कार्यक्षमता मोजण्याकरिता त्यांच्या प्रचरणांच्या गुणोत्तरांचा उपयोग करतात. या दोहोंपैकी कमीत कमी प्रचरण असलेला आकलक समजा t आहे व दुसरा t1 आहे. t चे प्रचरण आणि t1 प्रचरण असेल तर, t हा t1 पेक्षा अधिक कार्यक्षम आहे. जर हे लघुतम प्रचरण असेल तर, t1 ची कार्यक्षमता ही ने मोजली जाते. हीच संज्ञा प्रायोगिक संकल्पनाच्या (experimental design) गुणधर्माबाबतही वापरली जाते.

equilibrium

n. समतोल (पु.) [एखाद्या रांग पद्धतीतील वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांची किंवा वस्तूंची संख्या कमीअधिक होत असताना त्या संख्येचा मध्य आणि तिचे वितरण ही दोन्ही पुरेशा दीर्घ कालपर्यंत (over a long period) स्थिर राहत असतील तर अशी रांग पद्धती संख्याशास्त्रीय समतोल अवस्थेत आहे असे म्हणतात.]

evolutionary operation

विकासकारी क्रिया [ प्रस्थापित पूर्णविकसित प्रक्रियांच्या इष्टतमीकरणाकरिता (optimisation) बॉक्सने काढलेले तंत्र. उत्पादन प्रक्रियांमध्ये प्रयोग करण्याकरिता या तंत्राचा वापर केला जातो.]

external variance

बाह्य प्रचरण [ही संज्ञा दोन अर्थांनी वापरतात. (१) (द्विटप्पी) (two stage) नमुनानिवड पद्धतीतील प्राथमिक घटकांचे प्रचरण (variance of primary unit) आणि (२) कलाच्या (trend) दिलेल्या प्रकारावर (form) आधारलेल्या विशिष्ट काल क्रमिकेमधील भविष्यकालीन हालचालींच्या पूर्वानुमानांचे (forecasts) प्रचरण.]

equilibrium distribution

समतोल वितरण [एखाद्या भौतिक, आर्थिक किंवा सामाजिक पद्धतीची संख्याशास्त्रीय वर्तणूक स्थिर झालेली असेल तेव्हा तिचे वितरण स्थिर किंवा समतोल असते असे म्हणतात. पद्धतीच्या निर्दिष्ट अवस्थांत व्यतीत झालेल्या काळाची सीमांतग गुणोत्तरे या वितरणाने दाखविली जातात.]

evolutionary process cf. non-stationary stochastic process

अस्थिर यादृच्छिक प्रक्रम [ कोणताही अस्थिर (non-stationary) यादृच्छिक प्रक्रम. अशा प्रक्रमांशी संबंधित असलेले संभाव्य वितरण कालदृष्ट्या निरवलंबी नसते.]

evolutionary spectrum

विकासकारी मानपंक्ति [कोणत्याही यादृच्छिक प्रकमात किंवा कालक्रमिकेमध्ये मानपंक्ती फक्त एका मर्यादित कालावधीकरिताच लागू असल्यामुळे पूर्ण निष्णत्तीकरिता मानपंक्ति फल हे कालावलंबी किंवा विकासकारी असते.]

ensemble

n. प्रसंच (पु.) [एका (single) यादृच्छिक प्रक्रमाच्या निष्पत्तींच्या (realisations) अनंत संचाला 'प्रसंच' असे म्हणतात. ही संकल्पना (concept) निष्पत्तींच्या नमुना संचालाही बरेच वेळा लागू होते.]

ergodic state

स्थलकालनिरपेक्ष स्थिति, सुलक्षणी स्थिति [मार्कोव्ह मालिकेतील अनावर्तनी व सत्वरावर्ती स्थितील 'स्थलकालनिरपेक्ष स्थिती' असे म्हणतात. अनावर्तनीत्व व सत्यरावर्तित्व असे दोन चांगले गुणधर्म या स्थितीला असल्यामुळे तिला 'सुलक्षणी स्थिती' असेही म्हणतात. या स्थितीचा पुनरावर्तन काल सांत असतो.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)