आद्याक्षर सूची (608)

coefficient of total determination

बहुनिर्धारण गुणांक [समाश्रयण विश्लेषणात बहुचल सहसंबंध गुणांकाचा वर्ग : R2. बहुचल सहसंबंधात अवलंबी (यादृच्छिक) चलाच्या एकूण प्रचरणाच्या ज्या हिश्श्याचा निरवलंबी चलांच्या विचरणाने खुलासा होतो, तो हिस्सा या गुणांकाने दर्शवला जातो.]

compound distribution

संयुक्त वितरण [χ या यादृच्छिक चलाच्या एखाद्या वितरणातील प्राचल θ (थिटा) जर यादृच्छिक असेल तर थिटाच्या कोणत्याही पूर्व वितरणानुसार मिळणाऱ्या χ च्या बिनशर्त वितरणास 'संयुक्त वितरण' म्हणतात.]

correction for continuity

सांतत्य सुधार [एखादे नमुनाफल मूलतः असंतत (essentially discontinuous) असेल परंतु त्याचे संचयी वारंवारता संभाव्यता फल (distribution function) हे एका संतत फलाने समीपतेने (approximately)दाखविले असेल तर, संतत फलाच्या सारणीमध्ये या नमुनाफलांच्या प्रत्यक्ष (जशाच्या तशा) किंमती न घालता त्या थोड्याशा सुधारित किंमती घातल्यास त्या किंमती सांतत्य सुधारित किंमती होतात.]

correction for grouping

गटकरण दुरुस्ती cf. Sheppard's corrections [ज्यावेळी सामग्रीचे वर्गीकरण केले जाते त्यावेळी प्रत्येक वर्गातील निरीक्षणे त्याच्या मध्याशी केंद्रित झाली आहेत असे गृहीत धरून, परिबले काढताना ज्या चुका होतात त्या दुरुस्त करण्यासाठी अनेक लेखकांनी दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. या दुरुस्त्या प्रामुख्याने क्रमगुणित परिबले, बहुचली प्रकार, पृथक विचरण आणि संचयके यांसाठी आहेत.] (पहा :Sheppard's corrections)

C.S.M. test

ब.स. म. कसोटी (convexity, symmetry, maximum number outcomes test) [ब. स. म. कसोटी म्हणजेच बहिर्वक्रता, सममिति, महत्तम फलनिष्पत्ति-संख्या कसोटी. तुलनात्मक प्रयत्नांवरून मिळालेल्या २ X २ सारणीच्या स्वरूपातील आधारसामग्रीकरिता बर्नार्डने (१९४७) तयार केलेली ही लक्षणीयता कसोटी आहे. उदा. दोन नमुन्यांतील एखाद्या गुणाच्या प्रमाणांची (गुणोत्तरांची) तुलना करणे. ब. स. म. ही संज्ञा, कसोटीतील निर्णयन क्षेत्र (critical region) निश्चित करणाऱ्या बहिर्वक्रता, सममिती व फलनिष्पत्तींची महत्तम संख्या या तीन स्थितींवरून आलेली आहे.]

cepstrum

n. नितळ मानपंक्ति (स्त्री.) ['प्रतिध्वनी' चा परिणाम म्हणून ज्या कालक्रमिकांमध्ये पश्चता निर्माण होतात त्या कालक्रमिकांच्या विश्लेषणाकरिता बोगे (Bogert), हेली (Healy), टकी (Tukey) (१९६३) यांनी सुचवलेली ही एक पद्धति होय.]

control treatment

(also dummy treatment or placebo treatment) अक्रिय उपचार [प्रायोगिक संकल्पनांमध्ये सममिती अथवा इतर काही वैशिष्ट्ये राखण्याच्या हेतूने काही वेळा काही घटकांवर काल्पनिक उपचार केले आहेत असे समजले जाते. अशा उपचारांना 'अक्रिय उपचार' असे म्हणतात.]

certainty equivalence

निश्चति समतुल्यता [नियंत्रण नियमांद्वारे पूर्वानुमान आणि नियमितता यांच्याशी संबंधित असलेले हे एक तत्त्व होय. जर आदान क्रमिकांच्या स्वरूपासंबंधी भविष्यकाळात अनिश्चितता नसेल तर बऱ्याचशा बाबतीत संख्याशास्त्रीय सरासरी निकष फल किंवा सरासरी काल निकष फल कमीत कमी करून समतुल्य नियंत्रण नियम प्राप्त करता येतात.)

compound hypergeometric distribution

संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण [X च्या एखाद्या पूर्ववितरणानुसार X च्या सर्व शक्य असलेल्या किंमती विचारात घेऊन, दिलेल्या χ करिता अतिगुणोत्तरीय वितरणांची सरासरी घेतल्यास 'संयुक्त अतिगुणोत्तरीय वितरण' मिळते.]

complex demodulation

संमिश्र अविरूपण [मूळ क्रमिकेला किंवा यादृच्छिक प्रक्रमाला एखाद्या संमिश्र अयादृच्छिक फलनाने गुणिले असता येणारा अविरूपणाच्या तंत्रातील चल म्हणजे 'संमिश्र अविरूपण' होय.]

compound negative multinomial distribution

संयुक्त ऋण बहुपदी वितरण [χ चे वितरण ऋण बहुपदी असेल आणि त्यातील प्राचलांचा संच यादृच्छिक असेल तर या संचाच्या कोणत्याही पूर्व वितरणानुसार χ च्या बिनशर्त वितरणास 'संयुक्त ऋण बहुपदी वितरण' असे म्हणतात.]

current period cf. current year

प्रस्तुत वर्ष [निर्देशांक विश्लेषणात ज्या कालातील (1) किंमतीची दुसऱ्या कालातील (0) किंमतीशी तुलना केली जाते त्या कालाला (1) प्रस्तुत काल म्हणतात व दुसऱ्या कालाला (0) आधार काल म्हणतात.]

census distribution

प्रगणन वितरण [नवीकरण प्रक्रमाच्या (renewal process) विश्लेषणात निर्माण होणारी दोन घटनागणन वितरणे. पृथक बाबतीत पास्कल वितरणांची बेरीज म्हणून व संतत बाबतीत प्वॉसाँ वितरणांची बेरीज म्हणून ती विघटित (decompose)होतात.]

coherent structure cf. monotonic structure

एकस्वनिक संरचना [बहुघटकी संरचनेच्या विश्वासार्हतेच्या संदर्भात उपयोगात येणारी संज्ञा. यात चालू घटकांचा संरचनेच्या कार्यवाहीत अडथळा येत नाही. या प्रतिमानांमधील घटक व संरचना चालू किंवा बंद यापैकी एकाच स्थितीत असतात.]

closed system

बंदिस्त पद्धति [लिओंटिक खुल्या पद्धतीत, अंतिम मागण्या आणि एकक वेतनखर्च (वेतनदर धरून) अशा दोन गोष्टी आदान-प्रदान सारणीत असतात. अंतिम मागण्या ह्या 'घरकुलांच्या' मागण्या असतात. उद्योगांना पुरवठा करावयाची या घरकुलाची श्रमशक्ती दिलेल्या वेतनदरावर अवलंबून असते. बंदिस्त पद्धतीसाठी फक्त इतर उद्योगांची उत्पादने खरेदी करणारा आणि इतर उद्योगांना श्रमशक्तीचा पुरवठा करणारा घरकुले हा एक जास्तीचा उद्योग सारणीत समाविष्ट करतात. या नवीन उद्योगाची भर पडली की सर्व वस्तू या मध्यस्थ वस्तू होतात. मग अंतिम मागणी किंवा प्राथमिक निविष्टी यात भेद उरत नाही.]

complete class of tests

संपूर्ण कसोटी संच [ज्या कसोटी संचाबाहेरील प्रत्येक कसोटीपेक्षा त्या संचातील एक तरी कसोटी एकसमान सरस असते त्या संचास 'संपूर्ण कसोटी संच' म्हणतात]

cross amplitude spectrum

सहदोलविस्तार मानपंक्ति [समजा दोन कालक्रमिका मिळून एखादी द्विचल कामक्रमिका तयार होते तर या दोन क्रमिकांतील सहप्रचरण (covariance) दर्शवण्याकरिता, कालक्रमिकेच्या मानपंक्ति विश्लेषणात उपयोगात येणारी पद्धती म्हणजेच सहदोलविस्तार मानपंक्ति पद्धती होत.]

causal chain model

प्रयोजक साखली प्रतिमान [टिंबरजनने प्रस्थापलेले हे एक समष्टिअर्थशास्त्रीय (macroeconomic) प्रतिमान आहे. यात अंतर्जात (endogenous) चलांमध्ये साखळी सहसंबंध (chain pattern of relations) असतात. हे प्रतिमान पुढीलप्रमाणे: yt = Byt + Tzt +et येथे B व T ह्या गुणांकांच्या सारण्या आहेत आणि B ही एक उपकर्ण (subdiagonal) सारणी आहे.]

constant arrivals

स्थिर आगमने [राग प्रक्रमामध्ये बहुधा आगमनांचा वेग हा काळानुसार बदलत असतो. जर हा वेग काळावर अवलंबून असेल तर त्या आगमनांना 'स्थिर आगमने' म्हणतात.]

collapsed stratum method

मिश्रित स्तर पद्धति [दोन वा अधिक स्तर एकत्र करून एक स्तर बनवण्याची पद्धती. जेव्हा समष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विचलन असते अशा वेळी स्तरीकरणाची पद्धती इतकी ताणली जाते की अप्राप्ततेमुळे किंवा इतर काही कारणाने प्रत्येक समष्टिस्तरातून एकेकच घटक निवडावा लागतो. अशा वेळी नेहमीचे Var () चे सूत्र येथे वापरता येत नाही. तेव्हा सर्वसाधारणपणे २० च्या वर स्तर असतील तर, शक्यतो समान Ni (i = 1, 2, ....., L ) व शक्यतो समान yi असलेल्या दोन-दोन स्तरांच्या जोड्या बनवतात व प्रत्येक स्तरातून एकेक घटक नमुना म्हणून निवडला जातो.

counter model type I

(also type one counter model) गणक प्रतिमान-प्रकार-I [गायगर म्युलर गणकांच्या भौतिक वर्तनाशी संबंधित असलेला यादृच्छिक प्रक्रम प्रकार-I च्या प्रतिमानात, पूर्वीच्या गणनेच्या स्पंदाने व व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते.]

crest

n. उंचवटा (पु.) [पृथक कालक्रमिकेत शेजारच्या दोन्ही बाजूंच्या निरीक्षणापेक्षा जास्त असते ते निरीक्षण. संतत कालक्रमिकेत क्रमिका महत्तम होते तो बिंदू.]

counter model type II

(also type two counter model) गणक प्रतिमान-प्रकार-II [प्रकार II च्या प्रतिमानात, पूर्वीच्या कोणत्याही आगमनाच्या स्पंदाने न व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते. अधिक माहितीसाठी counter model, type I पहा.]

clisy

n. त्रिबल (न.) [द्विचल वारंवारता रचनांच्या बाबतीत कार्ल पिअरसनने ही संज्ञा वापरलेली आहे. वितरणाची त्रिमितीमधील असममिती मोजण्यासाठी हिचा उपयोग होतो.]

carrier variable

वाहक चल [घटकचय प्रयोगामध्ये एखाद्या संख्यात्मक राशीच्या वेगवेगळ्या किंमती संबंधित घटकाच्या निरनिराळ्या पातळ्या दर्शवतात. या संख्यात्मक राशीला 'वाहक चल' म्हणतात.]

clitic curve

त्रिबल वक्र [निरनिराळ्या वारंवारता रचनांकरिता एका चलाची असममिती दाखवणारे दोन प्रकारचे वक्र. (१) β1 (χ) व χ चा आलेख (कार्ल पिअरसन) (२) ϊ3 (χ) व χ चा आलेख (केंडॉल)]

communicating class

जा-ये संच [मार्कोव्ह साखळीमधील j स्थितीपासून k स्थितीकडे व k स्थितीपासू j स्थितीकडे जाता येत असेल तर या दोन स्थितींना जा-ये स्थिती म्हणतात. j स्थितीशी जा-ये करणाऱ्या सर्व स्थितींच्या C(j) ह्या संचाला j स्थितीचा 'जा-ये संच' म्हणतात]

crossed classification

संकरित वर्गीकरण [महत्तम कोटरित संकल्पनाचा (nested design) हा एक गुणधर्म आहे. समजा 'ए' व 'सी' असे दोन घटक आहेत. 'ए' च्या प्रत्येक पातळीबरोबर 'सी' ची प्रत्येक पातळी येत असली तर होणाऱ्या द्विमार्गी रचनेला संपूर्ण संकरित वर्गीकरण असे म्हणतात. याहून काहीही कमी असल्यास, त्याला अंशतः संकरित वर्गीकरण म्हणतात.]

cylindrically rotatable design

चितिवत गोलपृष्ठी संकल्पन [K-1 मितीमध्ये एका विशिष्ट अक्षावर केंद्रित झालेली प्रतिसादाच्या आकलांची प्रचरणे समान असतात तेव्हा अशा गोलपृष्ठी संकल्पनेच्या सुधारलेल्या संकल्पनेस 'चितिवत गोलपृष्ठी संकल्पन' असे म्हणतात.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)