net reproduction rate
निव्वळ प्रजनन प्रमाण [एखाद्या समाजाचे प्रजनन प्रमाण म्हणजे (पुढील पिढीतील व्यक्तींची संख्या / चालू पिढीतील व्यक्तींची संख्या) हे प्रमाण होय. येथे पुढील पिढीतील व्यक्ती या चालू पिढीतील व्यक्तींची मुले असतात, आणि त्यांची संख्या जनन प्रमाणांवर (birth rates) अवलंबून असते. एकूण प्रजनन प्रमाणात या आकडेमोडीत जन्मलेल्या मुलांच्या मर्त्यनेकडे (mortality) दुर्लक्ष केले जाते. निव्वळ प्रजनन प्रमाणात या मर्त्यतेचा विचार करतात, पण मर्त्यतेच आजची पातळी वापरतात. परिणामी प्रजनन प्रमाणात ही पातळी भविष्यकाळातली आणि म्हणून अंदाज केलेली असते. ए.प्र.प्र. > नि. प्र. प्र. > प. प्र. प्र. अशी असमानता असते. प्रजनन प्रमाणे पुरुष आणि स्त्रिया यांसाठी वेगवेगळी असतात. त्यांची संगणना साधारणतः स्त्रियांसाठी करतात.