collapsed stratum method
मिश्रित स्तर पद्धति [दोन वा अधिक स्तर एकत्र करून एक स्तर बनवण्याची पद्धती. जेव्हा समष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर विचलन असते अशा वेळी स्तरीकरणाची पद्धती इतकी ताणली जाते की अप्राप्ततेमुळे किंवा इतर काही कारणाने प्रत्येक समष्टिस्तरातून एकेकच घटक निवडावा लागतो. अशा वेळी नेहमीचे Var () चे सूत्र येथे वापरता येत नाही. तेव्हा सर्वसाधारणपणे २० च्या वर स्तर असतील तर, शक्यतो समान Ni (i = 1, 2, ....., L ) व शक्यतो समान yi असलेल्या दोन-दोन स्तरांच्या जोड्या बनवतात व प्रत्येक स्तरातून एकेक घटक नमुना म्हणून निवडला जातो. विचलन सूत्र खालीलप्रमाणे : Var (yi1 -yi2) = (yi1 - yi2)2 + Ni - 1 (S2i1 = S2i2) येथे प्रत्येक स्तरजोडी जणू एकत्र करून विश्लेषण केल्याचे दिसते. या पद्धतीला 'मिश्रित स्तर पद्धती' असे म्हणतात.]