आद्याक्षर सूची (277)

In the circumstances and the reasoning made in the preceding paragraphs, the Cabinet is requested to agree to the Department’s proposal for removal of the exemption.

या परिस्थितीत आणि वरील परिच्छेदातील कारणमीमांसेच्या संदर्भात, ही सवलत काढून टाकण्याबाबत विभागाने प्रस्तुत केलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मान्य करावा अशी विनंती आहे.

It is proposed that the quantum of grant should be decided broadly in accordance with the general pattern followed by the Education and Youth Services Department and in consultation with the Education and Youth Services Department.

शिक्षण व युवक सेवा विभागाने अवलंबिलेल्या सर्वसाधारण पद्धतीनुसार आणि त्या विभागाशी विचारविनिमय करूनच अनुदानाचे प्रमाण स्थूलमानाने ठरवण्यात यावे असे सुचवण्यात येत आहे.

If there is complete failure of crops in Kharif areas in sizeable tracts in these districts, it would be necessary to proceed with the procedure for declaring the annewari and depending on other factors concerning scarcity conditions, it should be possibl

या जिल्ह्यातील खरीप पिकाखालील बऱ्याच मोठ्या भागात पीक आले नाही तर आणेवारी जाहीर करण्याची कार्यवाही करावी लागेल आणि टंचाईला कारणीभूत होणाऱ्या इतर गोष्टी विचारात घेऊन सप्टेंबर १९७८ च्या अखेरीस टंचाई जाहीर करणे शक्य होईल.

Instead of granting exemption from payment of sales tax, a proposal to sanction an additional subsidy of 5% is put up for reconsideration of the Cabinet.

विक्रीकर भरण्याची सूट देण्याऐवजी ५ टक्के जादा अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या फेरविचारासाठी प्रस्तुत केला आहे.

It is proposed to establish an Agricultural Workers’ Provident Fund in accordance with the scheme to be made by Government. It is proposed that the fund should be administered by a Board to be constituted by Government.

शासन तयार करील त्या योजनेनुसार शेतमजुरांचा भविष्य निर्वाह निधी चालू करण्याचे योजिले आहे. या निधीचे व्यवहार शासन स्थापन करील त्या मंडळाने पाहावेत असे सुचवण्यात येत आहे.

If vacancies have to be filled up urgently, the Department / Offices are forced to recruit temporarily candidates through the Employment Exchange.

जर रिकाम्या जागा ताबडतोब भरावयाच्या असतील तर विभागांना/कार्यालयांना सेवा-योजना कार्यालयामार्फत उमेदवारांची तात्पुरती भरती करणे भाग पडते.

If we declare this approach, it is likely that present litigation and challenges in courts thrown by the landlords against us would be reduced substantially and we will be able to speed up the programme of environmental improvement of the area.

हे धोरण जाहीर केल्यास सध्या जमीन-मालकांनी शासनाविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचे प्रमाण बरेच कमी होईल आणि या भागाच्या पर्यावरणात्मक सुधारणेचे काम त्वरेने करता येईल.

It has been consciously decided not to link the tax with income as it would entail heavy work both for the administration and the tax payer involving substantial labour and expenditure disproportionate to the quantum of tax that can be levied as per the p

या कराची उत्पन्नाशी सांगड घालू नये असा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. कारण तसे केल्यास प्रशासनावर व करदात्यावर कामाचा खूप ताण पडेल आणि संविधानाच्या तरतुदीनुसार जो कर बसवता येईल त्याच्यामानाने श्रम व खर्च अधिक करावा लागेल.

In view of the above policy decision, the matter is put up before the Cabinet for decision on the question whether we should strictly adhere to the policy laid down by the then Minister (Law) or whether we should not make it rigid & appoint even advocates

वरील धोरणात्मक निर्णय लक्षात घेता, त्यावेळच्या विधि मंत्र्यांनी ठरवलेल्या धोरणाचे काटेकोर पालन करावे, की ते धोरण थोडे शिथिल करून, अधिवक्त्यांपैकी जे पात्र असतील त्यांचीच नोटरी म्हणून नेमणूक करावी, हा प्रश्न निर्णयासाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला आहे.

In villages where scarcity of drinking water is experienced, generally following measures are undertaken for relieving shortage of drinking water :-

ज्या खेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असते तेथे पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी सामान्यतः पुढील उपाय योजिले जातात:-

It is difficult to concede to the General Administration Department’s view point for the reason that dearness allowance is nothing but a compensation for the high cost of living.

सामान्य प्रशासन विभागाचे मत मान्य करणे कठीण आहे. कारण महागाई भत्ता म्हणजे केवळ राहणीमानाच्या वाढत्या खर्चाची भरपाईच होय.

In spite of these steps, as a result of the scarcity conditions in the last few years considerable effort is still needed to increase the tempo of agricultural development and make farming financially stable.

अशी उपाययोजना करूनसुद्धा, गेल्या काही वर्षातील टंचाईच्या परिस्थितीमुळे, कृषि विकासाची गती वाढावी व शेतीच्या व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी अजूनही खूप प्रयत्न करणे जरूर आहे.

It was impressed on the Collector & the Commissioner that this activity should be undertaken with speed in order to reduce hardships to the suffering families.

त्रस्त कुटुंबांचे हाल कमी करण्याच्या दृष्टीने हे काम त्वरेने हाती घेण्याबद्दल जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्‍त ह्यांना सूचना देण्यात आल्या होत्या.

In the light of the above clarification given by the Secretary, Law and Judiciary Department, and the consideration explained in the departmental note the Committee approved the proposals made in paragraph 11 of that note.

विधि व न्याय विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलेली परिस्थिती व त्या विभागाच्या टिप्पणीत मांडलेले विचार लक्षात घेऊन त्या टिप्पणीच्या परिच्छेद ११ मधील प्रस्ताव समितीने मान्य केला.

It will be necessary to issue executive orders and to proceed with amendment to the relevant statutory provisions in the M. Z. Ps. & P. Ss. Act.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियमातील संबंधित कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे काम कार्यकारी आदेश काढून सुरू करावे लागेल.

If paid, it is bound to be treated as a recurring commitment and also one which will attract similar requests from other institutions.

ही रक्कम दिल्यास, ती दरवर्षी मिळत राहील अशी समजूत होऊन बसेल आणि इतर संस्थादेखील ती मिळावी म्हणून अशाच प्रकारे शासनाला विनंती करतील.

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)