आद्याक्षर सूची (282)

ratio delay method

(also snap reading method) क्षणसापेक्ष निरीक्षण पद्धति [काल नमुनानिवड प्रक्रमाच्या विविध अवस्थांना लागणाऱ्या कालाचे प्रमाण ठरवण्यासाठी टिपेटने सुचवलेली पद्धती.]

response metameter cf. dose metameter

मात्रा रूपांतरित मूल्य [दिलेल्या चेतकाच्या प्रतिसादाचे रूपांतरित मापन. उदा. जैविक अभ्यासात आकडेमोड व आकृतिरूपण सोपे जावे म्हणून असे रूपांतरण करतात.]

records tests

उच्चनीचांक कसोट्या [उच्च मूल्यांवर / नीच मूल्यांवर आधारित कालक्रमिकेतील कलांच्या अभ्यासाकरिता वापरण्याच्या वितरणनिरपेक्ष कसोट्या. एखादे निरीक्षण मूल्य., क्रमिकेतील त्याच्या आधीच्या सर्व मूल्यांपेक्षा मोठे / लहान असेल, तर ते उच्च / नीच गणले जाते. फोस्टर व स्टुअर्ट यांनी अशा दोन कसोट्या मांडल्या आहेत.]

ridit analysis

(abbr. of relative identified distribution transformation analysis) साभिरूप विश्लेषण (सापेक्ष अभिज्ञात वितरण रूपांतरण विश्लेषण) [व्यक्तिनिष्ठ (subjective) वर्गीकरण केलेल्या अथवा नीट न नोंदलेल्या सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी ब्रॉसने सुचवलेली पद्धती. प्रसामान्य वितरणाऐवजी एकसमान वितरणाचा उपयोग करून नोंदीचे वाटप अभिज्ञात वितरणानुसार केले जाते.]

rectangular association scheme

आयताकार साहचर्य मांडणी [वर्तक १९५९] [तीन सहयोगी वर्ग असलेले हे एक अंशतःसंतुलित अपूर्ण गट संकल्पन आहे. पहिल्या दोन सहयोगांमधील संबंधांनुसार त्यांतील उपचारांच्या वर्गीकरणाच्या दोन संरचना एकावर एक ठेवून त्याची आयताकार मांडणी करता येते.]

recursive' system

सोपान प्रणाली [वोल्डने सुचवलेली, पुढील गुणधर्म असणारी, अर्थमितीमधील समीकरण प्रणाली. (१) (t-1) या क्षणापर्यंतच्या चलांच्या किंमती माहित असल्या तर त्या समीकरणांच्या साह्याने ' t ' या क्षणी त्या चलांच्या किंमती कोणत्याही क्रमाने मिळू शकतात व (२) प्रणालीतील प्रत्येक समीकरण एकतर्फी कारक (unilateral causal) अवलंबन दर्शवते.]

residual time cf. waiting time

प्रतीक्षा अवधि [नवीकरण प्रक्रमात कोणत्याही कालबिंदूपासून त्याच्या लगतपूर्वीच्या नवीकरण बिंदूपर्यंतच्या काळास 'अवशिष्ट अवधी' असे म्हणतात. या तीन अवधींतील संबंध खालील समीकरणाने स्पष्ट होतो : (लोटलेला अवधी = अवशिष्ट अवधी + प्रतीक्षा अवधी).]

rotatable design

गोलपृष्ठी संकल्पन [k-घटक प्रयोगाचे (factor experiment) अपेक्षित उत्पादन जर k-घटक पातळ्यांमध्ये d घाताची बहुघाती राशी असेल आणि जर आकलित प्रतिसादाचे (estimated response) प्रचरण हे त्या संकल्पनाच्या मध्यापासूनच्या अंतराचे फल असेल तर त्या k-घटक संकल्पनाला d वा क्रम असलेले "गोलपृष्ठी संकल्पन' म्हणतात. १९५७ मध्ये बॉक्स आणि हंटर यांनी ही संज्ञा उपयोगात आणली.]

rotation sampling

क्रमव्यापी नमुनानिवड [विल्क्सने सुचवलेली व एक्लेअरने सुधारलेली पद्धती. यात एका पाठोपाठ निवडलेल्या नमुन्यांच्या जोड्यांमधील घटक काही (इष्टतम) प्रमाणात सामाईक असतात.]

reduced error sum of squares

लघुकृत दोष वर्गबेरीज [एखाद्या संख्याशास्त्रीय संकल्पनेत प्रचरणाचे विश्लेषण करताना रेषीय प्रतिमान असे घेतात. यातील केले तर प्रतिमान असे होते. या नव्या प्रतिमानाला लघूकृत प्रतिमान म्हणतात व त्याच्या दोष वर्गबेरजेला 'लघूकृत दोष वर्गबेरीज' म्हणतात. जर मूळ रेषीय प्रतिमान असे n घटकी असेल तर पैकी कोणतीही ४ प्राचले शून्य करून वरीलप्रमाणे लघूकृत प्रतिमान मिळते व त्याच्या दोष वर्गबेरजेस 'लघुकृत दोष वर्गबेरीज' म्हणतात.]

random point method of selection

यादृच्छिक बिंदु निवड पद्धति [क्षेत्रांची नमुनानिवड आकारमानानुसारी संभाव्यता पद्धतीने सुलभपणे करण्यासाठी ही पद्धत आहे. या पद्धतीत नकाशावरील बिंदू यादृच्छिकतेने निवडतात. ते बिंदू ज्या ज्या क्षेत्रात पडतात ती ती क्षेत्रे निवडली जातात.]

robust

n. निबर (पु.) [संख्याशास्त्रीय कार्यपद्धती ज्या अनेक गृहीतकांवर आधारलेल्या असतात त्यापैकी काही गृहीतकांशी वस्तुस्थिथी जुळणारी नसते असे आढळून येते. गृहीतकांपासून वस्तुस्थिती दूर गेल्याचा ज्या कार्यपद्धतीवर फारसा परिणाम होत नाही, ती कार्यपद्धती निबर आहे असे म्हणतात. गृहीतकांपासून आपण कितपत दूर जाऊ शकतो यावर निबरपणाचे मान अवलंबून असते.]

route sampling

मार्गी नमुनानिवड [पिकांच्या पाहणीमध्ये, पुरेसे क्षेत्र समाविष्ट करणारा मार्ग निवडून रस्त्याच्या कडेने असणाऱ्या विविध पिकांची नोंदणी केली जाते. अशा रस्त्याच्या जागा यादृच्छिक असणे संभवनीय नाही व म्हणून त्यावर आधारलेले पिकांचे अंदाज पूर्वग्रहयुक्त असण्याचा संभव आहे. पण तोच मार्ग अनेक वर्षे वापरला असता मिळणारे अंदाज हे उपयुक्त ठरू शकतात. क्रमबद्ध नमुनानिवडीचा एक प्रकार म्हणून ही पद्धत पिकांचे अंदाज मिळवण्यासाठी वापरता येईल.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)