आद्याक्षर सूची (375)

pattern function

एकसूत्री फल [k नमुना फलांतील संचयके काढण्यासाठी उपयोगी असणारे नमुना संख्या n चे फल. द्विभाजनाच्या (bipartition) मांडणीतील शून्याच्या समग्रीकृतीवर (configuration) आधारलेले फल.]

pistimetric probability

श्रद्धामेय संभाव्यता [श्रद्धामूलक संभाव्यता (fiducial probability) या संज्ञेशी साम्य असणारी रॉयने सुचवलेली संज्ञा. यात प्रयोगाऐवजी दुर्मिळ माहितीवर आधारलेले निर्णयन अभिप्रेत असते.]

principles of equal ignorance

समअज्ञान तत्त्व [बेजच्या सूत्राशी हे संबंधित आहे. अनुभवपूर्ण संभाव्यतेच्या निश्चित माहितीच्या अभावी आपणास त्या संभाव्यतेविषयी समअज्ञान किंवा एकसमान वितरण गृहीत धरावे लागते.]

pay-off matrix

मेळ सारणी [खेळ सिद्धांतामध्ये दोन स्पर्धकांमधील सर्व डावपेचांच्या लढतींतील निष्पत्तींनुसार एकाकडून दुसऱ्याला असलेले देणे-येणे दाखवण्याची सारणी.]

prewhitening

n. पूर्वश्वेतन (न.) [मानपंक्तींचे मापन करण्यासाठी योजलेले हे रूपांतरण अचूक आकडेमोडीत उपयोगी ठरते. आकडेमोडीतील कुरव व विद्रूपता यांमुळे होणारे निषपत्तींचे अधःपतन रूपांतरित आदानाच्या मानपंक्तीचे विश्लेषण करून कमी करता येते. मानपंक्तीत विशिष्ट पद्धतीने बदल करून तिचे श्वेतन वाढवता येते.]

probit

n. प्रसामान्यक (न.) [प्रसामान्य वितरणाच्या किंमती क्वचितच ऋण होण्यासाठी त्याच्या समतुल्य विचलांच्या किंमतीत ५ मिळवून येणारी मूल्ये. ही संज्ञा ब्लीसने (१९३४) सुचवली.] adj. प्रसामान्यक

percoaltion process

पाझर प्रक्रम [ज्या यादृच्छिक प्रक्रमाचे भौतिक स्पष्टीकरण म्हणजे यादृच्छिक यंत्रणेने प्रभावित अशा माध्यमातून होणारे एखाद्या द्रवाचे अपस्करण असे असते तो प्रक्रम. विसरण प्रक्रमातील (diffusion process) यादृच्छिक यंत्रणा त्या द्रवावर प्रभाव पाडणारी असते.]

Polya frequency function of order two

कोटिका दोनचे पोल्या वारंवारता फल [जर x1 < x2 आणि t1 < t2 असे वाढत्या संख्यांचे दोन संच असले आणि II f(xi - tj)II 1,2 या सारणिकाचे मूल्य ऋण नसल तर हे कोटिका दोनचे पोल्या वारंवारता फल असते. या गटता प्रसामान्य, घातांकी, गॅमा, बीटा, पर्ल-रीड बृद्धिक्षय आणि एकसमान या वितरणांचा समावेश होतो.]

post cluster sampling

उत्तर समूहन नमुनानिवड [डॅलेनिअसने सुचवलेली संज्ञा. समूहांच्या रचनेविषयी माहिती उपलब्ध नसेल तर सुरुवातीला निवडलेल्या यादृच्छिक नमुन्यांच्या आधारे हे समून तयार होतात.]

priority queueing

अग्रक्रमी रांगप्रणाली [अशा प्रकारच्या रांगप्रणालीत आगमनांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या क्रमांत काहीशी सापेक्ष अधिपसंती असते. नेहमीच्या 'प्रथम आगमन प्रथम सेवा' या पद्धतीपेक्षा हा क्रम वेगळा असतो.]

partial rank correlation

आंशिक क्रमांक सहसंबंध [इतर चलांच्या क्रमांकनाचा प्रभाव कमी करून, दोन चलांच्या क्रमांकनामधील आंशिक क्रमांकन कल्पना यात मांडली आहे. केंडॉल टाउच्या आधारे केंडॉलने १९४२ मध्ये ही व्याख्या केली.]

persistent state

(also recurrent state) पुनरावर्ती स्थित [मार्कोव्ह मालिकेतील स्थिती जर निश्चितपणे पुन्हा प्राप्त होत असेल तर त्या स्थितीस 'पुनरावर्ती स्थिती' असे म्हणतात. पुनरावर्ती स्थितीचे दोन प्रकार : १ प्रदीर्घावर्ती स्थिती (null recurrent state = null persistent state = null state) २ सत्वरावर्ती स्थिती (non-null persistent state = non - null recurrent state = positive recurrent state).

plaid square

प्लेड चौरस [घटक विभाजन संकल्पनामध्ये लॅटिनकल्प चौरसाच्या संपूर्ण उभ्या व आडव्या ओळींत वेगवेगळे उपचार केले जातात. त्यामुळे या उपचारांच्या प्रमुख परिणामांचे उभ्या व आडव्या ओळींबरोबर संकुलन होते व त्यांच्या आकलनाचा नेमकेपणा कमी होतो.]

probability paper

१ संभाव्यता आलेखपत्र २ संभाव्यता पत्र [या आलेखपत्रावप य-अक्षाचे मापांकन (graduation) असे असते की क्ष-अक्षावर चलाची मूल्ये आणि य-अक्षावर त्या चलमूल्यानुसार दिलेल्या संचयी संभाव्यता फलाची मूल्ये घेतल्यास सरळ रेषा मिळते. अशा प्रकारची खास आखलेली संभाव्यतापत्रे प्रसामान्य, द्विपदी, प्वॉसाँ, इत्यादी वितराणांच्या बाबतीत उपलब्ध आहेत.]

precedence test

पूर्वत्व कसोटी cf. exceedance test [दोन नमुने एकाच समष्टीतून निवडलेले आहेत किंवा नाहीत यासंबंधीच्या परिकल्पनेविषयीची नेल्सनने सुचवलेली कसोटी.]

patch

n. स्तबक (पु.) [महालनोबिसने सुचवलेली संज्ञा. जेव्हा एककांची चलमूल्ये एखाद्या विशिष्ट अंतराळात पडतात किंवा ती गुणात्मक असली तर विशिष्ट प्रवर्गात मोडतात तेव्हा अशा एककांच्या संहत समूहास ही संज्ञा वापरतात. मात्र हा समूह परिपूर्ण व वाढू न शकणारा असला पाहिजे. याकरिता परिरेषा पातळी अशी संज्ञाही वापरतात.]

predicating variable

निर्धारक चल [समश्रयणी विश्लेषणामधील 'स्वतंत्र चला' ऐवजी एम.जी. केंडॉलने ही संज्ञा सुचवली. वरील विश्लेषणामधील स्वतंत्र चले ही गणिताच्या अथवा संख्याशास्त्राच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. ही संज्ञा समाश्रयी (regressor), स्पष्टीकरणात्मक चल (explanatory variable) व निर्धारणात्मक चल (determining variable) या संज्ञांशी समानार्थी आहे.]

process with independent increments cf. additive process

differential process [या यादृच्छिक प्रक्रमात असताना हे फरक निरवलंबी असतात. आणि हे निरवलंबी फरकांच्या बेरजेबरोबर मांडता येते. म्हणून याला बेरीजयोग्य प्रक्रम असेही म्हणतात.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)